छत्रपती शिवाजी महाराज कोर्स प्रवेश कसा घ्याल?

0
छत्रपती शिवाजी महाराज कोर्स प्रवेश कसा घ्याल?
Share

छत्रपती शिवाजी महाराज कोर्स माहिती हवी असल्यास खालील लेख आपल्यासाठीच आहे. पुणे विद्यापीठाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कोर्स काढला असून त्याची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

इतिहासात महाराजांनी वापरलेली गनिमी कावा, त्यांची युद्धनीती, महाराजांचे प्रशासन आणि राजे असतानाचे केलेले कार्य आणि योजना, महाराजांची अर्थनीती यावर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कोर्स करता येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग’ असे अभ्यासक्रमाचे नाव असून अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे हा एक वर्षाचा (दोन सहामाही) कोर्स सुरू करण्यात येत आहे. पदव्युत्तर पदविकेच्या म्हणजेच Post Graduation Diploma अभ्यासक्रमातून हा कोर्स मिळणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज कोर्स अभ्यासक्रम

 पहिले सत्र

  1. युद्धशास्त्र व युद्धनीती 
  2. नीतीकार
  3. प्रॅक्टिकल कंपोनेंट एँड रिसर्च मेथडॉलॉजी

दुसरे सत्र

  1. शिवाजी महाराजांचे आरमार
  2. प्रशासन
  3. ऐतिहासिक ठिकाणी भेट आणि प्रोजेक्ट अहवाल

प्रवेश कसा घ्याल?

14 जूनपासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ४ जुलै अखेरचा दिवस असून कोणत्याही क्षेत्रातील पदवी असलेला विद्यार्थी अर्ज करून प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम ऑनलाईन होणार आहे. शिकवणे इंग्रजीमध्ये राहणार असून परीक्षा इंग्रजी किंवा मराठी या दोन्ही विषयांमध्ये देता येणार आहे.

प्रवेश अर्ज भरून आपल्याला प्रवेश घेता येईल. खालील लिंक वर जाऊन आपले खाते बनवून प्रवेश अर्ज करू शकता.

प्रवेशप्रक्रिया अर्ज लिंक

अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी परीक्षा शुल्क ५०० रुपये आहे.

अभ्यासक्रम कसा असेल?

अभ्यासक्रम दोन सहामाही सत्रांमध्ये विभागला गेला असून प्रत्येक सत्रात चार विषय आहेत. एकूण आठ विषय असून प्रत्येक विषयाला चार क्रेडिट आणि शंभर गुण देण्यात आला आहे. एकूण 32 क्रेडिट आणि 800 गुणांचा अभ्यासक्रम आहे. यातील ५०% गुण सेमिनार, रिपोर्ट, Assignment, Term Paper यांना राखीव आहेत. राहिलेल्या ५०% साठी सत्राच्या शेवटी परीक्षा होणार आहे.

Chatrapati Shivaji Maharaj Course Information PDF

©PuneriSpeaks

Like us on FB PageTwitter, and Instagram

MORE:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.