छत्रपती उदयनराजे यांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर पलटवार, व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

0
छत्रपती उदयनराजे यांचा काँग्रेस राष्ट्रवादीवर पलटवार, व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण
Spread the love

छत्रपती उदयनराजे राज्यसभा सदस्य शपथविधी घेत असताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली, या घोषणेनंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना समज दिली आणि वादाला तोंड फुटले.

उदयनराजे भोसले यांनी या वादानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. सभागृहात झालेल्या प्रकाराबाबत संपूर्ण माहिती देत वाद थांबवा असे आवाहन केले.

काय म्हणाले छत्रपती उदयनराजे भोसले?

“उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे वर्तन चुकीचे नसून त्यांनी काँग्रेसच्या एका खासदाराने घेतलेल्या आक्षेपानंतर त्यांना फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं. अनेकांनी यावरुन वाद सुरु केल्याने माझी त्यांना वाद थांबवण्याची हात जोडून विनंती आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता. मी कधीही कोणाची बाजू घेत नाही. जर व्यंकय्या नायडू चुकले असते तर तिथेच बोललो असतो. सभापती या नात्याने घटनेला धरुनच ते बोलले. चुकीचे बोलले असते तर मीच त्यांना माफी मागण्यास सांगितलं असतं” असे उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.

“जे घडलंच नाही त्यावरुन राजकारण सुरु आहे. मी गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे. हा प्रश्न व्यंकय्या नायडूंना विचारण्याऐवजी आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस खासदाराला विचारायला हवा. शरद पवार तिथेच बसले होते त्यांना विचारा,” असे म्हणत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी वर पलटवार केला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू काय म्हणाले?

मी कायमच छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रशंसक आणि चाहता आहे. मी देवी भवानीचा देखील उपासक आहे. शपथ घेताना पारंपारिक पद्धतीनुसार कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत याची आठवण सभासदांना करून दिली. कोणाबाबतही अनादर नाही.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.