वय ७१ वर्षे झाले, मला जामीन द्यावा: भुजबळ

0
वय ७१ वर्षे झाले, मला जामीन द्यावा: भुजबळ

‘आता आपले वय ७१ वर्षे झाले आहे आणि २१ महिन्यांपासून कोठडीत असून तपास यंत्रणांना आणखी कोठडीची आवश्यकता नसल्याने जामीन द्यावा’, अशी विनवणी बुधवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने ‘पीएमएलए’ न्यायालयात करण्यात आली.

नवीन महाराष्ट्र सदनाचे बांधकाम व अन्य कंत्राटांच्या बदल्यात काळा पैसा कमाई केल्याचा आरोप असलेले भुजबळ यांनी जामिनासाठी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चपासून अटकेत असलेले भुजबळ यांचा जामीन अर्ज ‘पीएमएलए’ न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही डिसेंबर-२०१६मध्ये फेटाळला होता. ‘माझ्या अशिलाचे वय आता ७१ वर्षे आहे आणि ते गेल्या २१ महिन्यांपासून कोठडीत आहे. त्यांनी आतापर्यंत तपास यंत्रणांना चौकशीत पूर्ण सहकार्य केले असून त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा’, असा युक्तिवाद भुजबळ यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील हर्षद पोंडा यांनी केला. त्यांचा युक्तिवाद बुधवारी अपूर्ण राहिल्याने गुरुवारीही सुरू राहणार असून त्यानंतर सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. हितेन वेणेगावकर युक्तिवाद मांडतील.
Source

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.