चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ – १७ डिसेंबर, इ.स. १७४०) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.
चिमाजी अप्पा माहिती
थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठी राहिले. या जोडीला ‘राम-लक्ष्मण, सुद्धा म्हणले जाते, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते हेच खरे आणि तसेच चिमाजींबाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधत मराठा साम्राज्याचा विस्तार केला.
चिमाजी अप्पा इतिहास
१) चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र आणि बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू होते.
२) १७३३ मध्ये चिमाजी अप्पांनी सरदार शंकरबुवा यांच्यासोबत बेलापूर किल्ला जिंकला.
३) १७३७ साली तीन वर्षे मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांशी लढा देऊन वसई किल्ल्यावर विजय मिळवला.
४) किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.’ असे चिमाजी अप्पा वसई किल्ल्याच्या लढाईदरम्यान म्हणाले होते.
५) त्यांच्या पत्नीचे नाव रखमाबाई तर त्यांचे पुत्र सदाशिवराव पेशवे हे पानिपत लढाईचे नेतृत्व करताना वीरमरण पावले.
६) बाजीराव पेशव्यांइतकेच चिमाजी अप्पा हे शुर आणि पराक्रमी होते, रणनीती बनवण्यात ते कायम अग्रेसर असायचे.
७) वसई मधील एक मैदान व गावाला नरवीर चिमाजी अप्पांचे नाव देण्यात आले आहे.
८) चिमाजी अप्पा यांचा मृत्यू १७ डिसेंबर १७४० साली झाला
वसईची लढाई:
फेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.
शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.

या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.
अशा या पराक्रमी सेनानी ला @PuneriSpeaks कडून मानाचा मुजरा….?
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.