गेल्या आठवड्यात अमेरिकेने पाकिस्तान ची आर्थिक मदत बंद करून दहशतवादी पाळल्याचा आरोप केल्याने चीन चा तिळपापड झाला आहे. दहशतवादी संघटनांचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी केवळ एकाच देशावर टाकता येणार नाही, असे म्हणत चीनने पाकिस्तानचा पुळका घेतला आहे.
पाकिस्तान वर अमेरिकेने दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी दबाव वाढविल्यानंतर चीन ला आपला सार्वकालिक मित्रदेश असलेल्या पाकिस्तान चा पुळका आला आहे.
तालिबान आणि हक्कानी नेटवर्क, हाफीज सईद यासारख्या दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास पाकिस्तान मज्जाव करत असल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने गेल्या आठवडय़ात पाकिस्तान चे दोन अब्ज डॉलरचे आर्थिक साहाय्य स्थगित केले होते.
चीन च्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलताना पाकिस्तान ची बाजु घेत म्हणाले की दहशतवाद्यांशी लढण्याचे काम कोणा एका देशावर टाकून चालणार नाही.
दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करणे हे पाकिस्तान च्या हिताचेच आहे, असे चीन पाकिस्तानला पटवून देऊ शकते, असे मत व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्याने व्यक्त केले होते, त्याबाबत विचारले असता कांग यांनी पाकिस्तान ची बाजु घेत एका प्रकारे अमेरिकेवर निशाणा साधला आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
More:
राहुल फटांगडे ला न्याय मिळवुन देण्यासाठी सोशल मीडिया एकवटला… #Justice4Rahul
छत्रपतींचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी