चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, थेरगाव, पिंपळे-गुरव येथून जाणाऱ्या प्रस्थावीत रिंगरोड ला विरोध करण्यासाठी रविवारी घर बचाव संघर्ष समिती रविवारी आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झालेल्याच्या संधींवर घर बचाव संघर्ष समिती ने ‘जागरण शंभरी’ आंदोलन आणि आढाव सभेचे आयोजन केले आहे.
पिंपरी महानगरपालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत लवकरच कारवाई करणार आहे. त्यासाठी ‘जागरण शंभरी’ आंदोलन करणार असून याची बैठक नुकतीच शनिवारी बीजलीनगर मधील भवानी मंदिरात पार पडली.
प्रस्तावित मार्ग दाट लोकवस्तीतून न्हेण्याऐवजी पर्यायी मार्गाने वळवावा ही प्रमुख मागणी संघर्ष समितीची असून आंदोलन अजून तीव्र होईल अशी सूचना दिली गेली आहे.