हिंजवडी मधील आयटी कंपनीत संगणक अभियंता तरुणाने शुक्रवारी आत्महत्या केली. चिंचवड येथे शुक्रवारी ही घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुळचे उस्मानाबादचे असलेले अभिजित रामदास मुळ्ये वय ३८ सध्या गिरिराज हाउसिंग सोसायटी, बिजलीनगर, चिंचवड येथे राहत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार अभिजित हे संगणक अभियंता असून, हिंजवडीतील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला आहेत.
शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिस घटनास्थळी पोचले आणि अभिजित ला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु वेळ निघून गेल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अभिजित मुळ्ये हे चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. त्यांनी जवळपास १० शॉर्ट फिल्म तयार केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या स्त्रीभ्रूणहत्येवर आधारित ‘स्त्री-सुप्त’ या नाटकात त्यांनी काम केले होते. ८०हून अधिक प्रयोग झालेल्या या नाटकात त्यांनी आपली भुमिका बजावली होती. मोरया गोसावी यांच्या जीवनावर आधारित मालिकेत सुद्धा त्यांनी काम केले होते. नोकरीमुळे अनेक मोठ्या चित्रपटांतील भूमिका नाकाराव्या लागतात, याची खंत त्यांना वाटत होती. नोकरी सोडून चित्रपट क्षेत्र निवडावे अशी त्यांची इच्छाही होती. सांगवी येथील एका मित्राशी बोलताना त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Top 10 Digital Marketing Courses in Pune with 100% Placement Assistance
सरकार सोशल मीडियावर निर्बंध आणण्याच्या तयारीत, आपत्कालीन स्थितीत राहणार बंद?