Chinese based automobile startup NIO launched their first electric SUV model named ES8.

सध्या क्रूड ऑइल च्या कमतरतेपुढे नवनवीन ऊर्जेची साधने शोधण्यात सर्व संशोधक व्यस्त आहेत. त्यातच इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यात सर्वच वाहन निर्मात्या कंपनी प्रयत्न करत आहेत.

इलोन मस्क यांची Tesla Model X ही इलेक्ट्रिक गाडी बाजारात आली आणि सर्व जगाला एका नव्या उंचीवर न्हेउन ठेवले. सर्व वाहन निर्मिती कंपन्या स्वतःच्या इलेक्ट्रिक गाड्या बनवायला जोर देऊ लागल्या आहेत.

त्याला टक्कर देण्यासाठी एका चिनी कंपनी NIO ने Tesla X च्या अर्ध्या किमतीत स्वतःची ES8 लाँच केली आहे.
NIO ES8 FEATURES
किंमत: 448000 Yuan (जवळपास 43 लाख रुपये)
पॉवर: 480 KW/ 644 HP
टॉर्क: 840 Nm
0-100 Km/hr : 4.4 sec
NIO ES8 ही गाडी १० मिनिटाच्या चार्जिंग मध्ये तब्बल १०० किमी प्रवास करू शकते. चीन मध्ये कंपनी ने स्वतःचे १२०० सेंटर्स उघडले असून डिस्चार्ज झालेली बॅटरी बदलायला फक्त ३ मिनिटांचा अवधी लागतो. बॅटरी भाडेतत्वावर सुद्धा देण्याची सुविधा कंपनी ने दिली आहे.

गाडीमध्ये २३ प्रकारचे विविध सेन्सर असून संपूर्ण बॉडी सुरक्षेच्या दृष्टीने aluminium ची बनवली आहे.
रितेश देशमुख ने नुकतीच Tesla X घेतली असून त्याने त्याचा फोटो आपल्या ट्विटर वर शेअर केला होता
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला जेनेलीयाकडून महागडं बर्थ डे गिफ्ट..
भारतात ही गाडी केव्हा येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल….