आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?

0
आधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे?

Citizens Rights in Marathi

Citizens Rights in Modern Democracy | Marathi

Politician’s place in democracy, How to deal with politician’s

१) Citizens Rights: लोकशाही त जनता मतदान करून लोकप्रतिनिधी निवडत असते. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना जनता मतदानातून निवडून देत असते. जनता लोकप्रतिनिधीला जनतेच्या बाजू संबंधित सभागृहात मत मांडत, योजना आखत आणि राबवून घेण्यासाठी सभागृहात निवडून देत असतो. थोडक्यात हे लोकप्रतिनिधी हे कंत्राटी (हंगामी) कामगार असतात.

२) जनतेतून निवडून दिलेले सदस्य क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात, म्हणजे ते त्या जनतेचे सेवक असतात, मालक नाही हे जनतेने समजले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या चरणी लीन होत, मागेपुढे करणे हा मूर्खपणा जनतेने करू नये. प्रतिनिधींना सम्राट, आमचा राजा वगैरे फालतू शब्दांनी गोंजारत डोक्यावर बसवून घेऊ नये.

३) लोकप्रतिनिधींच्या प्रत्येक औपचारिक निर्णयावर आणि कृतीवर प्रश्न विचारायचा हक्क हा जनतेला संविधानाने दिलेला आहे, आणि जनतेने तो विचारला पाहिजे, यात काही गैर नाही. प्रतिनिधींच्या प्रत्येक कृतीला प्रश्न विचारायचे सोडून उलट समर्थन करण्याचे काम जेव्हा जनता करायला लागते, व त्यावरून एकमेकांत भांडायला लागते तेव्हा ती जनता मुर्खतेच्या कळसावर असते. अशा जनतेला काहीही भविष्य नसते. उलट ते राजेशाही साठी आमंत्रण असते. Citizens Rights प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत.

४) निवडून दिलेले लोकप्रतिनिधी स्थानिक, राज्य किंवा देशपातळीवर सरकार बनवतात. राजेशाही तील सरकारला प्रश्न विचारणे शक्य नसायचे. पण लोकशाहीत सरकारला प्रश्न हे विचारलेच गेले पाहिजेत, मग ते कुठल्याही मुद्द्यावर असू देत. जनता देशाची मालक असते, सरकार नाही. त्यामुळे सरकारला प्रश्न विचारून जनता देशद्रोही वगैरे कधीही बनत नाही. सरकारे येत जात राहतात, जनता कुठेही जात नाही. त्यामुळे सरकार हे मायबाप नाही तर आपले नोकर आहे हे नेहमी ध्यानात ठेऊन आपण प्रश्न विचारायचे थांबले नाही पाहिजे.

५) लोकनियुक्त सरकारचे निर्णय राबवण्यासाठी प्रशासन व सरकारी अधिकारी/कर्मचारी असतात. हे पूर्ण सेवाकाळात जनतेचे नोकर असतात. त्यामुळे एखादा ग्रामसेवक असो वा IAS/IPS, त्यांच्यात गुणात्मक फरक नाही. त्यांनाही तुम्ही हक्काने प्रश्न विचारू शकता, माहिती घेऊ शकता, आणि त्यांनी कुचराई केल्यास तक्रारही करू शकता. माहितीच्या अधिकाराखाली आपण कोणतीही माहिती मिळवू शकतो. जनतेचे सेवक हे जनतेला RTI अंतर्गत माहिती देणे भाग असते. RTI हा एक Citizens Rights चाच भाग आहे.

६) जनतेच्या प्रश्नांवर, गुन्ह्यांच्या घटनांवर न्याय द्यायला कोर्ट असतात. आणि सगळी कोर्ट ही निष्पक्ष असावी लागतात. त्यावर सरकारचे बंधन नसावे. कोर्टाला न्यायदेवता वगैरे म्हणून भक्तिभाव दाखवू नये. कोर्ट पुराव्यांच्या आधारे व कायद्याच्या आधारे काम करत असते, आणि त्याद्वारे निर्णय देत असते. कोर्टही कधीकधी चुकीचे असते आणि अशा वेळेस वरच्या कोर्टात जाण्यात किंवा कोर्टाच्या निर्णयावर योग्य शब्दात टीका करण्यात काहीही चुकीचे नसते.

७) देशातला मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कितीही गोंजारला गेला असेल तरी तो पैशावर चालणारा आहे हे ध्यानात ठेवावे. पैशासाठी मीडिया वाट्टेल ते छापू, बोलू आणि दाखवू शकतो हे त्रिकालबाधित सत्य आहे. डोळे, कान आणि मेंदू उघडा ठेवून मीडियाच्या प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत बनवावं. मीडियात आलेलं सगळं खरंच असतं, या अंधभक्तीतून बाहेर यावं!

८) देशाचे सैन्यदल हे देशाचे बाहेरील शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी व देशातील पोलीस हे अंतर्गत कायदा-सुव्यवस्थेसाठी भरती केलेले असते. सैनिकांना किंवा पोलिसांना घाबरायची वा त्यांचा रोज उदोउदो करण्याची काहीही गरज नसते. सैनिक व पोलिसांचे काम जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे काम शेतकरी, शेतमजूर, सफाई कर्मचारी, गवंडी, शिक्षक, मेकॅनिक, इंजिनिअर, डॉक्टर, अग्निशमन कर्मचारी, वकील, वेटर, व्यापारी आदी सर्व लोकांचे आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देशसेवाच करत असतो. सैनिकांचे, पोलिसांचे जीव गेल्यास दुसऱ्या देशाला जबाबदार धरण्याबरोबरच आपल्या देशातल्या सरकारला, सरकारी यंत्रणांना आणि धोरणांना सुद्धा प्रश्न विचारणे तितकेच गरजेचे आहेत. नंतर अजून कुणी शहीद होऊ नये म्हणून हे प्रश्न महत्वाचे असतात.

लोकशाहीचे यश हे लोकांच्या शहाणपणावर अवलंबून असते. अमेरीका किंवा युरोपात लोकशाहीच्या मार्गाने किती प्रगती झालीय हे एकदा डोळे उघडून बघा. पैसे/दारू घेऊन, जात/धर्म बघून मते टाकून लोकशाही यशस्वी होत नसते. सरकार, यंत्रणा, राजकीय पक्ष व बाबू लोकांच्या प्रति भक्तिभाव दाखवून देश सुधारत नाही. देश सुधारण्यासाठी स्वतःचे अधिकार जाणून घावे लागतात आणि त्याबरोबरच प्रश्न हे विचारावे लागतात!

हा लेख डॉ. विनय काटे यांच्या लेखावर संदर्भित आहे.

हा लेख आवडल्यास Whatsapp, Facebook, Twitter वर नक्की शेअर करा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठा जातीचा दाखला कसा काढायचा? संपूर्ण प्रक्रिया

Geneva Conventions Information, Geneva Conventions Protocols

Real Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.