शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा चालु असताना शिवप्रेमींचा असंतोष सरकारविरुद्ध उफाळून आला. शिवप्रेमींनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांना पळ काढण्यास भाग पाडले. यासंदर्भातला पंकजाताई मुंडे आणि शिवप्रेमी यांच्यात चालु असलेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यात पाळणा जोजाव्ल्यावर मुख्यमंत्र्यांचे भाषण होते परंतु यावेळी मुख्यमंत्री लगेच निघून गेले. शिवनेरीवर आधीपासूनच गोंधळ चालु असल्याने मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतल्याने शिवप्रेमींच्या रागाचा बांध फुटल्याने उरलेल्या मंत्र्यांना रोषाला सामोरे जावे लागले. पंकजाताई मुंडे यांनी संतापलेल्या शिवप्रेमींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना विनोद तावडे तेथून निघून गेल्याने शिवप्रेमी अजून संतापले आणि त्यांचा असंतोष अजुन वाढल्याने पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा तेथून काढता पाय घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता.
शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवप्रेमी नाराज होते, त्यामुळे पोलिसांनी सकाळी 4 वाजल्यापासून शिवप्रेमींना शिवनेरी गडाच्या पायथ्याशी रोखुन धरले होते.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर यावर सारवासारव करत मुख्यमंत्री मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाला गेले असल्याचे असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे स्पष्टीकरण दिले.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
ऐतिहासिक वाचण्यासाठी:
शिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे
काही लोक शिवजयंती सारख्या कार्यक्रमात ही राजकारण करू पाहतात. मुख्यमंत्री यांनी मुख्य कार्यक्रम आटपून मुंबई मधील महाराष्ट्र magnetic कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले. वास्तविक जे लोक तेथे गोंधळ घालत होत ते कोण होते. याची चौकशी केली पाहिजे. त्यांचा हेतू काय होता.