पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मगाव असणाऱ्या ‘वडनगर’चा समावेश असलेल्या ‘उंझा’ (Unjha) मतदारसंघातच भाजपच्या नारायण पटेल यांचा पराभव झाला आहे.
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी पणाला लागली होती. पंतप्रधान मोदींना मोठा झटका बसला आहे.
गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. पण मोदींना स्वतःचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ येथे पराभवाचा धक्का बसला आहे. त्याठिकाणी उमेदवार आशा पटेल या कॉंग्रेसच्या निवडून आल्या.
गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कसोटी होती. मात्र, भाजपने विजय मिळवला असला तरी राहुल गांधी यांनी यश मिळवल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झालाय.
आशा पटेल १९ हजार मतांनी विजयी ठरल्या आहेत. भूमिपुत्राची आपल्या जन्मगावी जादू चालली नाही, लोकं भावनिक न झाल्याने या मतदार संघात वेगळेच चित्र दिसत आहे.
१९१२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे नारायण पटेल निवडून आले होते.