शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालात गुजरातमध्ये ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतील उमेदवारांचा तपशील दिला आहे.
पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे त्यासाठी सर्व पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले असून त्यांचा तपशील पाहिला आता धक्का बसतोय.
जवळपास ९२३ उमेदवारांचा तपशील पाहिला असता काँग्रेस चे ३१ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. जवळपास ३६% उमेदवार गुन्हेगारी मध्ये मातब्बर आहेत. भाजपच्या २२ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असून तब्बल ही संख्या २५% वर जाते.
उभ्या असलेल्या उमेद्वारांपैकी १९८ जण करोडपती आहेत. सर्वात जास्त करोडपती उमेदवार उभे करण्यात मात्र भाजपाने बाजी मारली असून त्यांचे ७६ उमेदवार करोडपती आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसने पट मारला असून त्यांचेही ६० उमेदवार करोडपती आहेत.
काँग्रेसने उभे केले सर्वात जास्त फौजदारी खटला असलेले उमेदवार, भाजपचे उमेदवार करोडपती
