ज्या वयात मुले खेळायला पण शिकत नाहीत त्या वयात हा मुलगा लाखो रुपये कमवत आहे.
केरळच्या कोच्ची येथे राहणारा निहाल अवघ्या ६ वर्षाचा असुन तो कूकिंग मधून लाखो रुपये कमवत आहे. वयाच्या ४ थ्या वर्षी मुले बोलायला शिकत नाहीत त्या वयात निहाल स्वयंपाक करायला शिकला. वयाच्या ४ थ्या वर्षी आईला स्वयंपाकात मदत करत असताना त्यांच्या वडिलांनी त्याचा विडिओ काढला आणि फेसबुक वर टाकला. त्यानंतर त्या विडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या वडिलांनी हा प्रतिसाद पाहून Youtube वर चॅनेल काढले आणि त्यावर निहालचे कूकिंग विडिओ टाकायला लागले. हळूहळू निहाल प्रसिद्ध व्हायला लागला.
त्याच्या मिकी माउस केक च्या विडिओ अधिकार फेसबुकने विकत घेतले असून त्याचे त्याला तब्बल $2000 दिले.
निहालच्या होणाऱ्या कमाईतून त्याचे पालक ठराविक मुलांना मदत सुद्धा करतात.
२०१५ रोजी त्याच्या वडिलांनी Youtube चॅनेल काढला होता. दिवसेंदिवस त्याच्या चॅनेलची प्रसिद्धी वाढत आहे.
निहालला अमेरिकन पोपुलर शो ‘एलेन डी जेनरेस’ शो मध्ये पुटटू नावाची एक रेसिपी करण्यासाठी अवार्ड पण मिळाला आहे.
कसे वाटले या मुलाचे कौशल्य??
तुम्हाला आवडले असेल तर नक्की शेअर करा…..