कोरोना व्हायरस: इटली वरून भारतात आलेल्या पर्यटकांमधील २१ पैकी १६ जणांना कोरोना

0
कोरोना व्हायरस: इटली वरून भारतात आलेल्या पर्यटकांमधील २१ पैकी १६ जणांना कोरोना

इटली वरून आलेल्या २१ जणांपैकी १६ जणांना कोरोना व्हायरस झाल्याचे उघड झाले आहे. हे सर्व इटली देशाचे नागरिक असून सर्वांना Indo Tibetan Boarder Police quarantine facility मध्ये ठेवण्यात आले आहे.

DD News ने याबाबत बातमी प्रकाशित केली आहे. इटली वरून आलेल्या लोकांमधील एका व्यक्तीला कोरोना व्हायरस होता. त्यामुळे त्याच्यामुळे त्याच्या पत्नीसह एकूण १६ इटली च्या नागरिकांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना पर्यटस्थळांवर फिरवणाऱ्या भारतीय वाहनचालकाला सुद्धा कोरोना झाला आहे. यामुळे एकत्रितपणे १७ जणांना कोरोना व्हायरस ची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

कोरोना व्हायरस भारत

डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. ज्यात त्यांनी हे सर्व मिळून भारतात आत्तापर्यंत एकूण २८ जणांना कोरोना व्हायरस झाल्याचे सांगितले आहे.

कोरोनाबाबत माहितीसाठी हेल्पलाईन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता या संदर्भात कुणाला काहीही माहिती हवी असल्यास राज्य शासनाने हेल्पलाईन सुरू केली आहे. याचा 02026127394 हा राज्य नियंत्रण कक्ष क्रमांक आहे आणि 104 हा टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास शंकांचं निरसन केेले जाणार आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मराठ्यांचा राजा ‘शिवा’चा जेव्हा शिवा‘जी’ होतो

महाराष्ट्र संस्कृती: महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.