कोरोना पॅकेज: कोरोना मुळे संपूर्ण देश २१ दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये आहे. यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने यावर उपाययोजना आखत हातावर पोट असणाऱ्यांसाठी योजना आणली आहे. त्यांच्यासाठी १ लाख ७० हजार कोटींच्या विशेष पॅकेज ची घोषणा केली गेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या पॅकेज ची घोषणा केली.
आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभाग मध्ये काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार आहे. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सरकार गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ, १ किलो डाळ मोफत देणार आहे. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना चालू राहणार आहे. गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असे अनुराग ठाकूर यांनी जाहीर केले आहे. शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज
या पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जाणार आहेत.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी
- एसकेएफ कंपनीची ४८ लाखाची फसवणुक, आरोपीस जामीन मंजूर
- गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे …, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले
- गौतम अदानी आता टॉप 20 मध्येही नाहीत: संपत्ती फेब्रुवारी 2022 मध्ये $ 88 अब्ज होती, सप्टेंबरमध्ये 150, आज $ 61 अब्ज राहिली आहे
- Heart Attack Symptoms in marathi: यामुळे हृदयाच्या नसा होतात ब्लॉक, जाणून घ्या तज्ज्ञांकडून बचावाच्या पद्धती
- बृजभूषण शरण सिंह विरुध्द ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू, काय आहे वाद