कोरोना व्हायरस: हॉस्पिटलमधील लोकं का पळून जात आहेत?

0
कोरोना व्हायरस: हॉस्पिटलमधील लोकं का पळून जात आहेत?

जग कोरोना व्हायरस शी लढा देत आहे. बहुतेक देशांमधील लोक स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत आहेत. भारतात मात्र परिस्थिती वेगळी आहे. आपल्या इथे संशयित आणि लागण झालेले रुग्ण सुद्धा दवाखान्यातून पळून जात आहेत.

कोरोना व्हायरस आजाराशी लढा देताना आरोग्य संस्थेकडे अनेक भारतीय संशयाच्या नजरेने पाहत आहेत. यात आरोग्य संस्थांच्या अडचणीत भर पाडण्याचे काम अनेक रुग्ण करत आहेत.

महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोना चा रुग्ण पुण्यात सापडला. नंतर हळूहळू मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड येथे सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडायला लागले. त्यातच नागपूरहून एक रुग्ण दवाखान्यातून पळाल्याची बातमी आली आणि सगळ्यांना धक्का बसला. भयानक अशा रोगाला लढा देत असताना पळून जाऊन बाकीच्यांच्या जीवाला धोका निर्माण का करतात असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे.

हॉस्पिटलमधील कोरोना व्हायरस रुग्ण का पळत आहेत?

गेल्या आठवड्यात आग्रा मधील संशयित महिला दवाखान्यातून पळून गेल्याची खोटी बातमी आली. ती आणि तिचा नवरा युरोप दौऱ्यावर गेले होते. तिचा नवरा कोरोना व्हायरस पॉसिटीव्ह सापडल्यानंतर महिलेला सुद्धा दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु दवाखान्यातील असलेल्या सोयीने सर्वजण वैतागले असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. दवाखान्यातील अत्यंत वाईट परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी सांगितली. शौचालयाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे महिलेने तक्रार केली होती.

पुण्यातील भोसरी भागातील दवाखान्यात दाखल केलेल्या कोरोना रुग्णाने सुद्धा पळून जाऊन आपल्या घरी आश्रय घेतला होता.

भोसरी मधून पळून गेलेल्या कोरोना रुग्णाला पोलिसांनी पकडले, व्हिडिओ पहा

त्याला पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन पकडून आणल्याचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात वायरल झाला. तो का पळाला याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. त्यानंतर प्रत्येक दवाखान्याबाहेरपोलिसांचा पहारा लावण्यात आलेला आहे.

नागपूर आणि अहमदनगर मधून सुद्धा रुग्ण पळाल्याची बातमी येऊन गेली.

नागपूर कोरोना व्हायरस संशयित पळून गेल्याची संपूर्ण घटना

“दोन महिलांसह चौघे जण शुक्रवारी सकाळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येथे संशयित कोरोना व्हायरस संसर्गासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी आले होते. त्यांना वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र रात्री ते तेथून बाहेर पडले. अधिकाऱ्यांना न सांगता रुग्णालय सोडल्याने पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. सर्वत्र नाकाबंदी करत शोधाशोध केली गेली.

पोलिसांनी नंतर त्यांना शोधून काढले आणि त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. त्यांना रुग्णालयात परत येण्यास सांगण्यात आले. चाचणी निकाल मिळण्यास उशीर झाल्याने आणि रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रूग्णांसोबत शौचालय वापरायला लागत असल्याने आपण नाराज असल्याचे त्यांनी तक्रार केली. अखेर संशयित रुग्ण दवाखान्यात दाखल झाले.

ही एकमेव घटना नाही. ९ मार्च रोजी मंगळुरूमधील सरकारी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमधून कोरोना व्हायरस चा संशयित व्यक्ती बाहेर पडला आणि त्याने खासगी उपचार घेण्याची परवानगी मागितली. भारतीय सेना लष्कराची वेगळे ठेवणारी सुविधा असलेल्या मानेसरमध्ये रुग्णांनी चांगल्या सोयी-सुविधांसाठी गोंधळ घातल्याची घटना घडली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावले गेले.

मुंबई शहरातील रहिवासी अंकित गुप्ताने कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वच्छताविषयक परिस्थितीची छायाचित्रे पोस्ट केली. गुप्ताचा मित्र सध्या निरीक्षणाखाली होता. नंतर त्याला कोरोना नसल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मित्राने आणि इतर रुग्णांनी तक्रार केल्यानंतर दवाखान्यात साफसफाई करण्यात आली.

कोरोना व्हायरस परिस्थिती

परंतु सरकारी दवाखाना परिस्थिती एवढी बिकट होती की तिथे राहू शकत नसल्याचे संशयित रुग्ण म्हणाला. आणखी एक संशयित नव्या दुआ यांनी दिल्लीतील एका वेगळ्या वार्डातील स्वच्छतेबाबत तक्रार केली आहे.

पुण्यातील नायडू दवाखान्यातील रुग्णांनी सुद्धा तक्रारी केल्याची बातमी आली होती. डॉक्टर तपासायला येत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. जेवण खराब असल्याचे अनेकांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले होते.

दवाखान्यातील अस्वच्छता, निष्काळजीपणा, हलगर्जीपणा याला जबाबदार आहे की रुग्णांची भीती या पळण्याला जबाबदार आहे हे आपणांस ठरवायचे आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

कोरोना विषाणू: महत्वपूर्ण आणि सकारात्मक बाबी

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.