“नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा

0
“नगरसेवक हरवले आहेत” पुणेकरांच्या बँनरबाजीमुळे शहरात चर्चा

नगरसेवक हरवले अाहेत

पुणेकर आणि त्यांच्या टीका म्हणजे जगभरात प्रसिद्ध, त्यात पुणेरी पाट्यासाठी पुणे जगभरात प्रसिद्ध आहेच. नेमक्या शब्दांमध्ये समाेरच्यावर उपराेधिक टीका करण्यात पुणेकरांचा हात कोणी पकडू शकत नाही. पुणेकरांच्या पाट्यांमधून टीका करण्याच्या पद्धतीमुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॅनर लावून आपल्या समस्या मांडण्यासाठी पुणेकरांनी आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

नगरसेवक हरवले अाहेत

एका पाटीमधून पुणेकरांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांचे कान उपटले अाहेत. पुण्यातील प्रभाग क्र. 33 म्हणजेच वडगाव धायरी-सनसिटीचा भागामध्ये नगरसेवक हरवले अाहेत असे बॅनर लावण्यात अाले अाहेत. या बॅनरमुळे आजूबाजूला चर्चेला उधाण आले आहे.

नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत थेट नगरसेवकांना आसूड ओढले आहेत. या बॅनरची शहरभर चर्चा सुरु आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
राेडवर ड्रेनेजचे मैला पाणी…
रस्त्यांची प्रचंड दुरावस्था…
अपघातांची मालिका सुरु…
एक सजग नागरिक असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात अाला अाहे.
नगरसेवक निवडणूकीच्यावेळी मतं मागायला येतात परंतु निवडून अाल्यानंतर पुढील पाच वर्षे फिरकतही नाहीत अशी तक्रार अनेकजण करत असतात. परंतु या बॅनरमुळे स्थानिक नगरसेवक जागा होतो का हे पाहावे लागेल.
सततच्या पावसामुळे शहरात खड्यांचे साम्राज्य झाले असून नागरिक संतापले आहेत. रोज अपघात, ट्रॅफिक ला लोक कंटाळले असून यावर महानगरपालिकेने काहीतरी ठोस पावले उचलावीत अशी मागणी होत आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

महापौर राहुल जाधव: रिक्षा चालक ते पिंपरी चिंचवडचे महापौर, प्रेरणादायी प्रवास

महाराष्ट्र आणि मिसळ….!

फिफा विश्वचषक फॅन्स: फिफा विश्वचषक स्पर्धेत वायरल झालेल्या सुंदर फॅन्स चे फोटो

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.