#CoupleChallenge: पुणे पोलिसांचा फोटो शेअर करणाऱ्यांना इशारा

0
#CoupleChallenge: पुणे पोलिसांचा फोटो शेअर करणाऱ्यांना इशारा
Share

सोशल मीडिया आणि ट्रेंडिंग हे समीकरण रोजचे आहे. यात सध्या #CoupleChallenge या हॅशटॅग अंतर्गत प्रेमी युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत.

Pune Police

यात अनेकजण ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप वर आपल्या जोडीदारासोबतचे अनेक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. पुणे पोलिसांनी #CoupleChallenge ट्रेंड नुसार फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्याना सावधानतेचा इशारा दिला आहे.

पुणे पोलिस यांनी यावर अत्यंत समर्पक ट्विट केले असून यात लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेकजण ट्रेंड ला बळी जात कोणताही विचार न करता आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांना हा इशारा दिला असून असे फोटो पोस्ट करणाऱ्यांना असं कऱण्याआधी दोन वेळा विचार करा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कायम जागरुक राहण्यास देखील पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

#CoupleChallenge वर काय म्हणाले पुणे पोलीस?

पुणे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये असा इशारा दिला आहे की, आपल्या जोडीदारासोबत फोटो पोस्ट करताना नीट विचार करा. गोड वाटणारं चॅलेंज काळजी नाही घेतली तर चुकीचे देखील होऊ शकते. यात खाली लिहिले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चँलेंज न करो, केला तर कपलचा खपल चँलेंज होईल’. आपण पोस्ट केलेले फोटो मॉर्फिंग, बदला घेण्यासाठी पॉर्न तसंच इतर सायबर क्राइमसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.

पुणे पोलिसांनी कोणतेही आवाहन स्विकारताना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

आपण सुद्धा या चॅलेंज मध्ये सहभागी झाला होता? आम्हाला खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.