कोविड-19 लक्षणे बहुतेकदा या क्रमाने दिसू लागतात असे अभ्यासातून जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेकांना कोविड-19 आणि फ्लू मधील फरक समजत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा लेख उपयोगी आहे.
कोरोना व्हायरसची रुग्ण जगभरात वेगाने वाढत आहेत आणि आपल्या भारतात हा रोग आणखी भयानक मार्गाने पसरत चालला आहे. लस पूर्णपणे काम करण्यास किमान दोन-तीन वर्षे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु कोविड-19 रोगाचे लक्षणे ओळखणे आणि त्यापासून बचाव करणे ही एकमेव खरी पद्धत आहे जी संक्रमणाला भयानक वळण घेण्यापासून रोखू शकते.
आम्हाला माहित आहे की कोविडची लक्षणे बर्याच घटकांवर भिन्न असतात- त्याकरिता तुमचे वय, तीव्रता, आधीचे असलेले रोग आणि लिंग, परंतु बर्याच प्रकरणांमध्ये, कोविड-19 एका विशिष्ट पद्धतीने सुरू होते. संशोधकांनी अशी संभाव्य लक्षणे देखील ओळखली आहेत जी केवळ कोरोना झाल्यानंतर दिसू लागतात.
दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या नवीन अभ्यासातुन असे सुचविले आहे की कोविडची लक्षणे एका विशिष्ट क्रमाने सुरू होतात, ज्यामुळे फ्लूसारख्या आजार आणि कोविड-19 आजार यातील मूलभूत फरक समजता येऊ शकतो.
कोविड-19 आणि फ्लू मधील फरक
ताप आहे आणि खोकला नाही ही कोरोना झाल्याचे प्रथम लक्षण असू शकते.
कोविड-19 आणि फ्लू विषाणू एकाच कुटूंबाशी संबंधित आहेत आणि बर्यापैकी समान लक्षणे देखील आहेत. अनेक Covid-19 झालेल्या रुग्णांमध्ये प्रथम ताप आल्याचे दिसून आले आहे. याव्यतिरिक्त फ्लू झालेल्या व्यक्तीस आधी खोकला सुरुवात होऊन पुन्हा ताप आल्याचे दिसून येते. फ्लू असल्यास एकाच वेळी एकापेक्षा जास्त लक्षणे दिसू लागतात.
WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात Covid-19 विषाणूंमध्ये ताप हे लक्षण सर्वात जास्त प्रमाणात नोंदवलेले एक लक्षण आहे. जगभरातल्या एकूण 55929 प्रयोगशाळांमध्ये याचा अभ्यास केला असता 87.9% लोकांना ताप हे लक्षण दिसून आले आहे.
फ्लू रूग्णांना ताप येण्यापूर्वी सामान्यतः खोकला होतो. कोरड्या खोकल्यासह, पाठदुखी, थंडी वाजून येणे यासारखी लक्षणे दिसून येतात.
कोविड-19 लक्षणे बहुतेकदा या क्रमाने दिसतात
कोविड-19 विषाणू आणि फ्लू विषाणू यामध्ये साम्य आहे परंतु लक्षणे येण्याचा क्रम भिन्न असतो असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. चीनमधील रुग्णांच्या अभ्यासातून असे दिसून आले की लक्षणे खालील क्रमाने दिसून येतात
- ताप
- खोकला, अंगदुखी
- मळमळ, उलट्या
- जुलाब
- धाप लागणे /थकवा जाणवणे
आपण कोरोना चाचणी कधी करावी?
आपला ताप कोरोना व्हायरस संसर्ग असल्याची शंका आल्यास, आपण प्रथम डॉक्टरकडे जावे. आपल्या शरीराचे सामान्य तापमान 97-99 डिग्री Fahrenheit ( जवळपास 36-38 ℃) दरम्यान असते.
आपली लक्षणे 3 दिवसांत कमी न झाल्यास आणि आपल्या शरीराचे तापमान कायम 99 डिग्री Fahrenheit पेक्षा जास्त असल्यास, कोविड-19 चाचणी करायचा विचार करा. याआधी लक्षणे दिसून येतात स्वतःला विलगिकरण करावे आणि योग्य ती खबरदारी घ्यावी. इतर लक्षणांवर देखील लक्ष ठेवावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.
कोविड-19 ची अजून काही लक्षणे आहेत का?

काही विशिष्ट कोविड-19 झालेल्या रुग्णांना केवळ छातीत दुखणे, वास येणे बंद होणे किंवा जठरोग विषयक संसर्गाची लक्षणे दिसून आली आहेत.
काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांची भेट घ्या.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.
अजुन वाचण्यासाठी:
- ड्रायव्हिंग लायसन्स वैधता वाढवणे झाले सोप्पे, ऑनलाइन वैधता कशी वाढवाल?
- मारुती सुझुकीची नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त..
- जानेवारी पासून लसीकरण ला सुरुवात ; कोरोनाचे दिवस संपले : डॉ. हर्ष वर्धन
- उद्धव जी… आताही वेळ आहे !मोदींना भेटा- आ. चंद्रकांतदादा पाटील
- काश्मीर ते सातारा: काश्मिरची मुलगी झाली साताऱ्याच्या पाटलांची सून