कोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात

0
कोविड-19 लस: अमेरिकेतील 4 मोठ्या कंपन्या लस बनवण्याच्या अंतिम टप्प्यात
Share

जॉन्सन आणि जॉन्सन या कंपनीने आपल्या कोविड-19 लस च्या क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. यानंतर लगेचच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील चार कोविड-19 लस उमेदवार अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

कोविड-19 लस Covid 19 vaccine

अमेरिकेत अंतिम टप्प्यात असलेल्या कोविड-19 लस

1. फायझर लस Pfizer Vaccine

Corona vaccine

फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोएनटेक एसई यांनी तयार केलेली लस कोविड-19 लस शर्यतीत अग्रणी मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सूचित केले आहे की ही लस एफडीएची मंजुरी मिळविणारी पहिली बनू शकते.

अपेक्षित: कंपनीने जाहीर केले आहे की ऑक्टोबरच्या अखेरीस त्यांची लस गुणकारी आहे की नाही हे कळेल.

2. मोडर्ना लस Moderna Vaccine

जगातील कोविड-19 लस

मोडर्ना लस mRNA-1273 कोरोना व्हायरस लसीच्या अंतिम टप्प्यात असून चाचणीसाठी 30,000 जणांची नावनोंदणी सुरू आहे. ही लस प्रभावी ठरल्यास उच्च जोखमीच्या लोकांवर याची चाचणी करण्याची परवानगी घेण्याची कंपनीची योजना आहे.

अपेक्षित: 2020 अखेर मोडेर्ना चे 200 करोड डोस लस बनवण्याचे उद्दीष्ट आहे.

3. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस Oxford-Astrazeneca Vaccine

या लसीच्या अमेरिकेतील चाचण्या सध्या थांबविण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाला पुन्हा त्याची चाचणी सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. 8 सप्टेंबर रोजी ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत लस विकसित करणार्‍या फार्मा कंपनीने जाहीर केले होते की UK मधील दोन सहभागींमध्ये लस घेतल्यानंतर काही आजार उद्भवले होते. यानंतर या लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. UK, भारत आणि ब्राझील मध्ये या चाचण्यांचे पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेत यावर विचार सुरू आहे. भारतात सिरम बरोबर या कंपनीने करार केलेला आहे.

अपेक्षित: 2021 च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध करुन देण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

4. जॉन्सन आणि जॉन्सन लस Johnson & Johnson Vaccine

आधीच्या टप्प्यात आलेल्या सकारात्मक निकालानंतर जॉन्सन आणि जॉन्सन यांनी बुधवारी सांगितले की, ते कोविड-19 लस क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करीत आहेत.

अपेक्षितः ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास जॉन्सन आणि जॉन्सन म्हणतात की 2021 च्या सुरुवातीला लस सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.