रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi

0
रोनाल्डो आणि मेसी 3 वर्षानंतर येणार समोरासमोर, गोल्डन तिकीट 22 कोटी रुपयांना विकले : Ronaldo vs Messi

क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यात कोण सर्वोत्तम आहे यावर 10 वर्षांहून अधिक काळ वाद सुरू आहे. डिसेंबर 2020 नंतर प्रथमच गुरुवारी दोघेही आमनेसामने येणार आहेत. त्यावेळी युव्हेंटसने बार्सिलोनाचा ३-० असा पराभव केला होता. त्यामुळे शेवटच्या सामन्यात तरी रोनाल्डो ची टीम जिंकली होती.

रोनाल्डो सामन्यात मेस्सीच्या पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) विरुद्ध अल हिलाल आणि अल नासर खेळाडूंनी बनलेल्या रियाध ST XI संघाचे नेतृत्व करेल.
दोन्ही स्टार फुटबॉलपटूंचा संघर्ष पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. हा सामना रियाधच्या किंग फहद स्टेडियमवर होणार आहे. माहितीनुसार, त्याच्या ऑनलाइन तिकिटांसाठी 20 लाख पेक्षा जास्त विनंत्या आल्या आहेत.
VIP “Beyond Imagination” तिकीट म्हणजेच सामन्याचे गोल्डन तिकीट सौदी अरेबियाच्या एका व्यावसायिकाने विकत घेतले आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हे सर्वात महागडे तिकीट आहे. द सनच्या वृत्तानुसार, मुशर्रफ बिन अहमद अल-गहमादी यांनी गोल्डन तिकिटासाठी 2.2 मिलियन युरो म्हणजेच 22 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले.
गोल्डन तिकिटासाठी सुमारे 4.4 कोटी रुपयांची बोली लागली. गोल्डन तिकीट विजेत्याला उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याव्यतिरिक्त सामान्य मनोरंजन प्राधिकरण (GEA) चे अध्यक्ष तुर्की अल शेख यांच्या शेजारी बसून सामना पाहण्याची संधी मिळेल.
याशिवाय तो विजेत्या समारंभाला उपस्थित राहू शकणार आहे. विजेत्या संघाच्या ग्रुप फोटोमध्ये समाविष्ट करता येईल. ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकतो. रोनाल्डो, मेस्सी, नेमार आणि एमबाप्पे यांसारख्या खेळाडूंना भेटू शकतील आणि जेवणही करू शकतील.
किलियन एमबाप्पे आणि नेमार हे देखील यात असतील

पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध ST XI यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यात Kylian Mbappe, Sergio Ramos आणि Neymar सारखे खेळाडू देखील असतील. हे तिन्ही खेळाडू पॅरिस सेंट जर्मेन (PSG) चा भाग आहेत. याशिवाय फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्धच्या अपसेट सामन्यात गोल करणारा सौदी अरेबियाचा सालेम अल-दवसारी आणि सौद अब्दुलहमीद हेही खेळणार आहेत.

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.