दशक्रिया : श्रद्धा की अंधश्रद्धा…?

0
दशक्रिया : श्रद्धा की अंधश्रद्धा…?

दशक्रिया श्रद्धा की अंधश्रद्धा यावर एक उत्तम लेख आपण आज वाचणार आहोत. दशक्रिया करावी का करू नये यावर अनेक मतभेद असतील तर आपल्या शंकाचे निरसन या खऱ्या गोष्टीवरून होईल यात शंका नाही.

एकदा पैंठणला एका ठिकाणी दशक्रिया विधी चालु
असतो. लोक आजुबाजुला बसलेली असतात.
Photo Credit's
घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात. शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो. एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात आणि तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणि भटजी कडे विनवणी करतो की मला खुप भुक लागली आहे.
दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणि समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातील एक गोळा मला द्या. हे ऐकुन भटजी संतापतो. भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकटलेला आणि भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात. तरी पण तो माणुस परत विनवणी करतो. आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला. त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही. कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे. म्हातारा तरी ऐकेना म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात. मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठ आहे. भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात.
Photo Credit's

दशक्रिया विधी नेहमीप्रमाणे नदीच्या काठावर करतात. मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो. सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ? हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो “बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय… लोक म्हणतात “कुठ आहे शेती तुझी”. म्हातारा म्हणतो “अमरावतीला.”
लोक म्हणतात “कुठ आहे अमरावती?” म्हातारा म्हणतो “खुप लांब आहे अमरावती.” लोक आणि भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात “आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय आणि शेताला पाणी कसं मिळेल.” यावर म्हातारा म्हणतो “दशक्रिया ला इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा भटजी पोचवत असेल तर मी टाकलेल पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही?” हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हा होता.
दशक्रिया श्रद्धा की अंधश्रद्धा
वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र विचार त्यासाठी करावा लागतो.
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको…

कृपया लेखकाने @punerispeaks वर संपर्क साधावा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.