आणि दया…कुछ तो गडबड है हा संवाद आला उदयास

0
आणि दया…कुछ तो गडबड है हा संवाद आला उदयास

टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणुन गणली जाणाऱ्या सीआयडी मालिकेतील दया…कुछ तो गडबड है! हा संवाद मालिका चाहत्यांनी अनेक वेळा ऐकला आहे. सीआयडी म्हणले की हा संवाद सर्वांच्या तोंडी येतोच.

२८ जानेवारी १९९८ रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित झाला होता. नुकतीच या मालिकेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येक पात्र लोकांच्या आठवणीत कायम आहेत. एसीपी प्रद्युम्न, सीनियर इन्स्पेक्टर दया, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत या सर्व भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकेतील काही संवादही चांगलेच गाजले. असाच एक लोकप्रिय संवाद म्हणजे..दया, कुछ तो गडबड है! एसीपी प्रद्युम्न या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या शिवाजी साटम यांचा हा लोकप्रिय संवाद आणि त्याबरोबर केलेले हातवारे बघता बघता खुप प्रसिद्ध झाले.

‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना मराठमोळ्या शिवाजी साटम यांनी या संवादाची सुरुवात कशी झाली हा किस्सा सांगितला. ‘दया..कुछ तो गडबड है, या संवादालाही जवळपास १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. एके दिवशी मी आणि मालिकेचे दिग्दर्शक बी.पी.सिंग चर्चा करत होतो. रंगभूमीचा कलाकार असल्याने बोलताना हातवारे करण्याची मला सवय आहे. ते पाहून त्यांनी मला मधेच थांबवले आणि विचारले तू हे काय करत आहेस. त्यावर मी तुमच्याशी चर्चा करत आहे, असं सहज म्हटलं. पण त्यांनी विचारलं, ‘तू बोलताना असे हातवारे का करतोयस?’ मी म्हटलं माझी नेहमीची शैली आहे. हे हातवारे त्यांनी हेरत त्याचा उपयोग मालिकेत करायचा निर्णय घेतला. मी सुद्धा त्याला होकार दिला. एका दृश्यादरम्यान गंभीर विचार करताना एसीपी तो संवाद म्हणेल असे ठरले आणि दया..कुछ तो गडबड है! हा संवाद उदयास आला.

तर आपल्याला कशी वाटली ही बातमी….आम्हाला नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर #खूनीसरकार हॅशटॅग वर लोकांनी विचारला सरकारला जाब

 

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.