आळंदी व देहू तून पंढरपुरात जाणारी आषाढी वारी आणि लाखो भाविक हे समीकरण असणारी वारी राज्यात असलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे वारी निघणार की नाही याबाबत संभ्रम आहे. वारी काढावी का, कशी काढावी याबाबत विविध मते व्यक्त केली जात आहेत. मात्र, याबाबत सरकारी पातळीवर आज दुपारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आषाढी यात्रेसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्यासोबत दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेणार आहेत. त्यात यात्रेसंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या यात्रेची अनेक वर्षांची परंपरा आहे. पंढरपूर च्या विठ्ठलाला भेटायला आळंदी व देहू तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून पालख्या मोठ्या संखेने येतात. प्रशासन व सरकार पुढे अनेक प्रश्न आहेत. वारीला परवानगी द्यायची कि नाही, ते दिली तर काय नियोजन करायचे.
राज्यात पोलीस प्रशासन सुद्धा खूप व्यस्थ आहे. अनेक पोलिसांना कोरोना ची बाधा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांना अजून किती भार द्यायचा हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. राज्यात सैनिक कमी पडत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगावू मागणी केंद्राकडे केली आहे. त्यात हा भार वाढला तर अजून सैनिक मागवावे लागतील.
महाराष्ट्रात सोशल मिडिया वर अनेक अफवा या आषाढी वारी संदर्भात उठत आहेत. लोक निरनिराळे मेसेज एकमेकांना पाठवत आहेत. लोकांच्या भावना ही तितक्याच महत्वाच्या आहेत. तत्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठक घेऊन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा विषय मांडला जाणार आहे.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.