नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

0
नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

नोटाबंदी अपयशी

8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र अनेकांना आठवत असेल, अचानक रात्री आठ च्या सुमारास पंतप्रधानांनी देशासमोर भाषण करत पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. या निर्णयाने देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई झाली होती. जुन्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकांसमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

परंतु या नोटाबंदी चा काहीच फायदा झाला नसल्याचे उघड झाले आहे. सरकारच्या नोटाबंदी च्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला माघारी मिळाल्या आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालातून ही सत्यता सर्वांसमोर आली आहे.

नोटाबंदी चा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 41 हजार कोटी रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी आत्तापर्यंत 15 लाख 31 हजार कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ला परत मिळाल्या आहेत.

केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नसल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जाहीर केले आहे.परत मिळालेली रक्कम अत्यल्प असल्यामुळे नोटाबंदीचा काहीच फायदा नसल्याचं म्हटलं जात आहे.

नोटाबंदी केल्यानंतर सरकारने मोठा आव आणत मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकेत परत येणार असा दावा केला होता. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या या नोटबंदी आकडेवारीने नोटबंदी च्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला आणि कोणाला झाला असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

नोटबंदी यशस्वी झाली का नाही? आपल्याला काय वाटते हे आम्हास नक्की कळवा….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

सोशल मीडिया एक भस्मासूर…! पडताळणी न करता मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांसाठी ही पोस्ट

बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

भाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.