दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय

0
दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय
Share

दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय, दात किडणे घरगुती उपाय, दात पांढरे करण्याचे उपाय असे अनेक प्रश्न आपणांस पडले असतील तर हा लेख आपण नक्की वाचावा.

दातांची काळजी कशी घ्यावी?

दातांची काळजी घेण्यासाठी साधे सोप्पे उपाय आहे ते आपणांस आधी समजून घ्यायला हवे.

ब्रश करण्याचे तंत्र:
कोणतीही टूथपेस्ट चमत्कार करीत नाहीत, त्यासाठी ब्रश करताना आपल्या दात आणि हिरड्या यावर कठोर होत दाबून कधीही ब्रश करू नका. ब्रश करण्याची एक सोप्पी पद्धत आहे ती म्हणजे “गोलाकार ब्रश करणे”. ब्रश हा आडवा किंवा उभा फिरवण्याऐवजी गोलाकार पद्धतींने फिरवल्यास दातातील अडकलेले अन्नपदार्थ निघण्याची शक्यता जास्त असते. कायम लक्षात ठेवा की २ मिनिटे ब्रश करणे पुरेसे आहे

दिवसातून किती वेळा दात घासावेत?

अनेकजणांना हा प्रश्न पडत असतो की दिवसातून नक्की किती वेळा दात घासावेत. याचे उत्तर हे २ वेळा असून जास्तीत जास्त दिवसातून २ वेळा दात घासायला हवेत.

Floosing करण्याचे फायदे

योग्य मार्गाने फ्लॉश केल्यामुळे दातांमधील अडकलेले अन्न कण निघून जाऊन दातांचे काढून वाढण्यास मदत होते.

Mouth Wash करण्याने काही फरक पडतो?

सध्या बाजारात अनेक प्रकारची Mouth Wash उपलब्ध असून Chlorhexidine असलेल्या माउथवॉश मुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि दातांची कीड रोखण्यास मदत होते. परंतु माउथवॉश च्या अतिवापरामुळे दातांवर डाग येण्याची शक्यता असते.

आपल्या दातांच्या डॉक्टर ने सुचवल्याशिवाय माउथवॉश न वापरलेले बरे, हे सुद्धा लक्षात ठेवा की माउथवॉश वापरणे हे ब्रश करण्यास पर्याय असू शकत नाही.

दातांची निगा राखण्यासाठी काय खाणे टाळावे?

गोड पदार्थ किंवा कोका कोला सारखी शितपेये टाळा. खासकरून जेवताना ही काळजी नक्की घ्यावी. आम्लपित्तयुक्त अन्न किंवा पेय पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात घासण्यापासून टाळा. अ‍ॅसिड मुळे दातांची झीज लवकर होते. गोड आणि चिकट अन्न, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा.

दातांची निगा राखण्यासाठी काय खावे?

हिरव्या पालेभाज्या, चीज, सुक्का मेवा, दूध, जीवनसाथ अ आणि क असलेली फळे खाल्ल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते. जास्तीत जास्त पाणी पित राहिल्याने दातांवर होणारा आम्ल युक्त पदार्थांचा दुष्परिणाम टाळता येतो. 

दातांची कीड घालवण्यासाठी उपाय

दातांची कीड घालवण्यासाठी उपाय, दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय

दर सहा महिन्यांनी आपल्या दंत चिकित्सकास नक्की भेट द्या आणि आपल्या दातांची तपासणी करा. दातांची झीज किंवा कीड होण्याआधी वाचवण्यासाठी दंत चिकित्सक यांचा सल्ला घ्या.

दातांचा पिवळटपणा कसा कमी करावा?

दातांची काळजी कशी घ्यावी, दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय, दात किडणे घरगुती उपाय, दात पांढरे करण्याचे उपाय

दर सहा महिन्यांनी किंवा कमीतकमी प्रत्येक वर्षाला स्केलिंग केल्याने दातांचे रोग होण्यापासून वाचू शकता. स्केलिंग केल्याने दातांची पिवळटपणा जाऊन हिरड्या निरोगी होतात. खासकरुन मधुमेह, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी आणि गर्भधारणा असल्यास स्केलिंग नक्की करावे.

दातांची कीड काढण्यासाठी घरगुती उपाय

  • कोमट पाण्यात तुरटी मिक्स करुन रोज गुळण्या केल्याने दातांची कीड आणि दुर्गंधी नष्ट होते. 
  • वडाच्या झाडाचे दूध कीड लागलेल्या दातांवर लावल्याने कीड मरतात.
  • दालचीनीचे तेल कापसात भरून कीड लागलेल्या दातांत लावा. यामुळे दुखणे थांबेल आणि कीडदेखील नष्ट होईल.
  • हळदीची पुड आणि मीठ एकत्र करुन त्यात जवसचे तेल मिक्स करा. तयार झालेल्या या पेस्टने दिवसातून दोन ते चार वेळेस दात घासा. असे केल्याने दातातील कीड मरतात. 
  • लवंगचे तेल कापसाच्या बोळ्यात भिजवून कीड लागलेल्या दातावर ठेवा. यामुळे दातातील कीड नष्ट होतात.
  • तुरटी, सेंधव मीठ आणि नौसादर सममात्रेत घेऊन बारीक पावडर बनवा. ही पावडर सकाळ-संध्याकाळ दात आणि हिरड्यांना लावा. यामुळे कीड नष्ट होण्यास मदत होईल. 

लक्षात ठेवा की आपल्या निरोगी आरोग्यासाठी दातांची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्नाची वाट ही तोंडावाटे शरीरात असून उत्तम आरोग्यासाठी निरोगी दात असणे आवश्यक आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हास नक्की कळवा. आपल्याला अजून कोणत्या प्रकारचे लेख वाचायला आवडतील हे खालील कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

साभार:

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.