मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. वारणा, कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘कोणत्याही समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सरळ माफी मागितली.
फडणवीस यांनी १२ नोव्हेंबर ला पाटस येथील साखर कारखान्याच्या उद्घाटनावेळी नाभिक समाजाबद्दल विवादास्पद विधान केले होते. आघाडी सरकारच्या कालावधीतील सिंचन योजनांवर झालेल्या खर्चावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी नाभिकाचे उदाहरण दिले होते. याबद्दल नाभिक समाजाने तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत भाजपच्या मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांची दाढी आणि कटिंग न करण्याचा निर्णय नाभिक संघटनेने घेतला होता.
पुन्हा एकदा मुख्यमंत्रानी माफी मागितली असून नाभिक संघटना काय पवित्रा घेतेय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
News Source
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाची माफी मागितली
