धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी धर्मा पाटील या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागतेय यावरून संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. पाटील यांना वयाच्या ८४ व्या वर्षी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला
धर्मा पाटील प्रकरण?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विखरण गावात धर्मा पाटील आपल्या आपल्या कुटुंबासहित शेतीच्या आधारावर घर चालवत राहत होते. राज्य सरकारच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी शिंदखेडा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात आले. या भूसंपादनात शेतकरी पाटील यांची एकूण पाच एकर जमीन संपादित केली गेली. पाटील यांना पाच एकर शेतीचा फक्त ४ लाख रुपये मोबदला देण्यात आला. धर्मा पाटील यांच्या शेतात ६०० आंब्याची झाडे लावली होती जमीन बागायती होती तरीही कोरडवाहू जमीन ठपका लावत बाजारभाव नाकारण्यात आला. त्यांच्या जमिनीत बोअरवेल आणि विहीर देखील होती. सरकारी नियमानुसार प्रकल्पासाठी जमिनीच्या चार पट मोबदला देण्याचे धोरण असते. परंतु पाटील यांना ५ एकर शेतीचे ४ लाख ३ हजार रुपये इतकाच मोबदला देण्यात आला. तर लगतच्या शेतमालकांना जवळपास दीड कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा पाटील कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
धर्मा पाटील यांचा पाठवुरावा
धर्मा पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तीन महिन्यांपासून धर्मा पाटील मंत्रालयाचे हेलपाटे मारत फिरत होते.
परंतु, न्याय मिळत नसल्याची खात्री पटताच पाटील यांनी गेल्या आठवड्यात २२ जानेवारीला मंत्रालयातच विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन केल्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार चालु होते. तिथेच त्यांचा रविवारी २८ जानेवारी संध्याकाळी मृत्यु झाला. पाटील यांच्या विषप्राशनानंतर सरकारने भानावर येत पाटील कुटुंबीयांना १५ लाख रुपयांचे सामुग्रह अनुदान देऊ केले. सरकारचे हे अनुदान पाटील कुटुंबीयांनी धुडकावून लावत आम्हाला अनुदान नको, तर मोबदला हवा अशी स्पष्ट मागणी केली आहे.
धर्मा पाटील यांच्या जमिनीबाबत ऊर्जा मंत्रालयाचा खुलासा
धर्मा पाटील यांच्या जमिनीची किंमत धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली होती त्यानुसार जमिनीचा मोबदला दिला असल्याचे महानिर्मितीने म्हटले आहे. या मोबदल्यावरून विरोधकांनी सरकारला जबाबदार ठरवत चोहुबाजूंनी टीका केली आहे. सोमवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाच्या अधिग्रहनाच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले आहेत.
धर्मा पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
२ डिसेंबर २०१७ रोजी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. मला योग्य न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशा सविस्तर शब्दात त्यांनी मुख्यमंत्रांना निवेदन दिले होते. त्यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना देखील त्यांनी निवेदन दिले होते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी देखील डिसेंबर २०१७ मध्ये निवेदन देण्यात आले. मात्र, आपल्याला न्याय मिळत नसल्याने कंटाळून अखेरीस पाटील यांनी आपला प्राण त्यागण्याचा निर्णय घेत मंत्रालयात विषप्राशन केले.
एवढ्या मंत्र्यांना न्याय मागूनही आपल्या लोकशाहीत न्याय मिळत नसल्याने कोणापाशी न्यायाची अपेक्षा करायची हेच लोकांना समजत नाहीये. आपले आयुष्य शेतीत खर्ची घालून राबणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाची किंमत मिळत नाही याहून दुसरे दुर्दैव ते काय…
आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
अजुन वाचण्यासाठी:
Bitcoin in Marathi । Bitcoin म्हणजे काय? जाणून घ्या मराठीत
लागीरं झालं जी मालिकेतील शिवानी बावकर म्हणजेच शितली ला एका दिवसाचे मिळते एवढे मानधन
सर नमस्कार सर माणूस आत्महात्या हे टोकाचे भुमिका सुखाने नाही घेत त्याला जबाबदार प्रशासन असते. प्रशासनाला शासन पगार देतो. पण प्रशासन गुन्हेगारांना मदत करते म्हणून फरार आरोपी हे अटक आरोपींन माहिती असून आजतागायत न्यायालयात हजर करण्यात पोलीस अपयशी ठरत आहे.उल्हासनगर ०१ पोलीस स्टेशन दिनांक २१/०१/२०१३ रोजी ची गु.रजि ( F i r) नंबर i २३/२०१३ आणि दिनांक २२/०१/२०१३ आणि दिनांक २३/०१/२०१३ रोजी पोलीस रिपोर्ट जावक नंबर दोन ४७१ आणि ४९८ मध्ये फरार आरोपी हे अटक आरोपींन माहिती असून आजतागायत उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट २ या वर्ग केस नंबर आर.सी.सी.१०००४७७७ मधील फरार आरोपी हे अटक आरोपींन माहिती असून निष्पण करण्यास पोलीस अपयशी ठरत आहे.