कोल्हापुरात धोनी-रोहित फॅन्स आमने-सामने; फॅन ला दिला ऊसाच्या शेतात नेऊन चोप

0
कोल्हापुरात धोनी-रोहित फॅन्स आमने-सामने; फॅन ला दिला ऊसाच्या शेतात नेऊन चोप
Spread the love

कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर मध्ये IPL मधील चेन्नई आणि मुंबई संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्या फॅन्समध्ये चोपाचोपी झाल्याची घटना घडली आहे. शिवीगाळ केल्यामुळे एकाला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिल्याची घटना घडलेली आहे. याबाबत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात आलेली नसून पोलीस वेळीच सावध झाले आहेत.

कोल्हापुरात म्हणजे रांगड्या पैलवानांचा जिल्हा, याच कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड याठिकाणी महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचे चाहते समोरासमोर आले आणि यातून एकाला उसाच्या शेतात चोप मिळाला आहे.

धोनी-रोहित फॅन्स मध्ये नक्की काय घडले?

चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स या संघाच्या चाहत्यांमधील कटुता सर्वांना माहीतच आहे. याच प्रतिस्पर्ध्याच्या कटुतेमधून ही हाणामारी झाली आहे. झाले असे की मागच्याच आठवड्यात महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाला. यानंतर त्याच्या चाहत्यांनी कुरुंदवाड मध्ये धोनी च्या नावाने अनेक होर्डिंग्ज लावले. नंतर रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आणि रोहितच्या चाहत्यांनी देखील शहरात अभिनंदनाचे होर्डिंग लावले. आणि दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली प्रतिस्पर्धा.

झाले असे की रोहित शर्मा अभिनंदनाचे लावलेले होर्डिंग्ज कोणी अज्ञाताने फाडले. या होर्डिंग्ज फाडा फाडीने फॅन्स गटातील धुसफूस वाढत गेली. होर्डींग्ज फाडल्याने रोहित शर्माचा फॅन असलेल्या तरुणाला राग आला आणि त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणाऱ्या तरुण चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन चोप दिला गेला.

कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांच्यानुसार या मारहाणीची अजून कोणतीही तक्रार आली नाही. संबधित होर्डिंग्ज पालिकेकडून काढण्यात आले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.