भारतातील लोक बुद्धिमान लोकांच्या यादीत कायम वरचढ ठरत आलेले आहेत, याचे उदाहरण म्हणजे भारतीय लोकांचे सध्या जागतिक स्तरावर असेलेले स्थान.
बौद्धिक पातळीवर कायम वरचढ असणाऱ्या भारतीयांच्या मानात अजुन एक तुरा रोवलाय तो दिव्या देशमुख हिने. बुद्धिबळपट्टू दिव्या हिने ब्राझील येथे झालेल्या “जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत” सुवर्णपदक कमावले आहे.
भारतातून तब्बल १९ जणांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यातून ती एकटी भारतीय विजेतेपदाची मानकरी ठरली.
संपूर्ण स्पर्धेत ती अजिंक्य राहिली, एकूण ११ गेम खेळलेल्या दिव्या ने ८ मध्ये विजय आणि ३ मध्ये ड्रॉ करून विजयपद पटकावले.
दिव्या ने आजपर्यंत भरपूर स्पर्धेत आपली कामगिरी उत्तुंग अशी राखली असून २०१६ साली झालेल्या कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा तिने सुवर्ण पटकावले होते.
दिव्या ला आमच्याकडून लाखो शुभेच्छा??