औरंगाबाद: शहरात स्वस्त दरात विकल्या जाणाऱ्या बिर्याणी मध्ये कुत्र्यांचे मांस टाकले जात असल्याची शंका केंद्रीय पशु कल्याण मंडळाच्या पशु कल्याण अधिकारी मेहर मथरानी यांनी व्यक्त केली.
काही दिवसांपासून शहरात कुत्र्यांची मुंडकी सापडत आहेत पण त्यांचे शरीर मिळत नाहीये, कुत्र्यांच्या या अमानुष हत्येला जबाबदार व्यक्तींना लवकरच पकडले जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
लोकांना फसवण्यास जबाबदार असणाऱ्यांना लवकरच कारवाई करून आत टाकू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लवकरच नसबंदी पुन्हा चालू करणार असल्याचे सुद्धा ते बोलले.