हुंडा: देत नाही मागतात चा दुसरा भाग | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

0
हुंडा: देत नाही मागतात चा दुसरा भाग | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

हुंडा: देत नाही मागतात भाग २

हुंडा: देत नाही मागतात भाग १

सुमित आणि अमिताच लग्न ठरलेलं. त्याची काहीच अट नव्हती. पण तिची होती. ती म्हणजे हुंडा हा प्रकार आपल्या होणाऱ्या नात्यात आणून आपल्या नात्याला दुषित करायचं नाही. आणि सुमितच म्हणन होत कि ह्या गोष्टी मोठ्या लोकांच्यातल्या आहे त्यात आपण पडायला नको. पण अमिताला वाटायचं आपण अडून राहिलो तर कदाचित मोठ्यांचे विचार हि बदलतील. पण माणसांचे जेवढे जास्त शिक्षण तितके मागासलेले विचार असतात.

अमिता पुण्याला शिकत होती. घरापासून दुसऱ्या शहरात राहत होती. अशात आई बाबांनी तिच्या लग्नाची जबाबदारी पार पाडण्याच काम हाती घेतले. पण पुढे काही वेगलेच घडले. होणाऱ्या नवऱ्यासोबत अमिताच बोलन सुरु होत. अशात कॉलेजच्या ट्रीप साठी अमिताला नेपाळला जायचं होत. घरातून परवानगी होती. आता परवानगी काढावी लागली होणाऱ्या घरातून. कशीतरी परवानगी काढून ती नेपाळ ला गेली. तिथपण ती नवऱ्याचाच विचार करत होती. रेंज कमी जास्त असल्याने फोनवर बोलने तिला जमल नाही. पण नवऱ्याच्या आणि त्याच्या आई वडिलांच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. तिच्यावर नाहीते आरोप करत संशय घेऊ लागले. अमिता प्रयत्न करत आपल्या बाजूने बरोबर वागण्याचा आणि ती वागायचीच नीट पण तरी तिच्यावर नसते ते आरोप व्हायचे.

अशात ती घरापासून एवढया दुर असताना विचार करून-करून आजारी पडली. कशीबशी तिच्या घरापर्यंत ती आली. आजारी अवस्थेत असताना त्याला काहीच वाटल नाही तिच्याबद्दल, दिवस गेले. दिवाळीची सुट्टी लागली तिला. ती घरी गेली. लग्नाची तयारी सुरु होणार होती. अमिता आणि तिचे वडील, बहिण सुमितच्या घरी गेले. त्यांचे स्वागत चांगले झाले पण ती सुरुवात होती. हुंडा या विषयाची.

हुंडा

दुसऱ्या दिवशी सगळे खरेदीला गेले. कपड्यांची खरेदी झाली आणि वाट्टेल ते घेत सुमितच्या आई वडिलांनी कसला मागचा पुढचा विचार न करता खरेदी केली. सुमितच्या आई ने दहा हजाराची नुसती साडी घेतली. सुमितचे कपडे आणि बाकी पै-पाहुण्यांचे कपडे अस मिळून एक लाख भर रुपयाचे कपडे त्यांनी घेतले. आणि पैसे द्यायला लावले अमिताच्या वडीलांना. आपली परिस्थिती नसताना आपण का विनाकारण असे पैसे घालवायचे या विचाराने अमिता चिडली आणि दुखी ही झाली. पण तिचे हात बांधले गेले होते. या इतक्या लुटमारी नंतर हुंडा नकोच अस तिला वाटत होत.

पुन्हा होस्टेलला आल्यानंतर सुमितशी तीच बोलन झाल. आणि हुंड्याचा तीने विषय काढला पण त्याने मौन व्रत पाळले होते या बाबतीत. त्याच्याकडून मोबाईल घेऊन त्याच्या वडिलांनी खूप सुनावलं अमिताला. अगदी रडवलच तिला. काय हक्क होता त्यांचा तिच्यावर अजून कशातच काय नव्हत? तुला हुंड्या बद्दल कोणी सांगितल आहे का? तुझ्या आई-बाबा, बहिणीने शिकवले का? असे उलट सवाल ते करू लागले. तीने सांगितले ते का शिकवतील आणि माझी मला समज आहे हे समजायला. आणि तीन दिलेल्या उलट उत्तराचा राग मनात ठेवून त्यांनी तिला समज द्यायचं ठरवल.

तिच्या घरातल्यांना मंगळसुत्रा पासून जोडवी, दागिने ते मुलासाठी चेन, अंगठी, त्यांच्या घरातल्यांसाठी कपडे आणि लग्नाचा हॉल ही अमिताच्याच वडिलांनी सगळा खर्च करावा अशी त्यांनी अट ठेवली. सुमित उच्च शिक्षित अभियांत्रिक होता. खूप पैसा घरात पडून होता तरी पैशाची हाव त्यांना सुटत नव्हती. लग्नानंतर तो हैद्राबादला राहणार होता. आणि अमिता आई वडिलांच्या पाशी. म्हणजे लग्न फक्त नावाला करायचं आणि सेवा करायची सुमितच्या आई वडिलांची. कशात काही नसताना सुमितच्या आई वडिलांनी अमिताला खूप बोलून रडवलं. त्यांच्या पाहुण्यांसमोर खूप अपमान केला पण वयाने लहान आणि बालिश विचाराच्या अमिताला यातलं काहीच सांगाव वाटल नाही घरी. आणि ज्या दिवशी अमिताच्या घरी हे सगळ कळले तेव्हा त्यांनी माघार घेतली. पण तीही माघार सुमितच्या घरचे घेऊन देत नव्हते. मुलीचे प्रेम बघून तिचा साखरपुडा लाऊन दिलाच. मुलाच्या पैशावर, हॉल अगदी रंग उडालेला. कुठल्या एका बाजूला असलेला हॉल यांनी बघितला आणि अमिताच्या वडिलांकडून अपेक्षा की त्यांनी ऐपत नसताना हि खर्च करून सगळ व्यवस्थित करायचं, लग्न पार पाडायचं. आणि लग्न झाल्यावर काय तर हुंडा द्यायचा.
या सगळ्या नंतर अर्थातच अमिताच्या घरून विरोध होणार होताच. पण त्या आधीच सुमितने या सगळ्याला पूर्ण विराम देऊन दुसरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरु केला.
या सगळ्यात भावनांची हेंडसाळ झाली अमिताची. लग्न तुटल्याचा बट्टा लागला तिच्यावर. आणि नंतर लग्न का मोडल कुणी विचारल तर अमिताच्या चारित्र्यावर काहीही बोलून सुमित आणि तिच्या आई वडिलांनी तिची बदनामी सुरु केली. काय साध्य झाल यातून. आणि काय साध्य होईल अशा हुंड्यातून. शिकून उपयोग नाही नुसत. शिकलेलं जगता आल पाहिजे. अमिता आता एकटी आहे. लग्न प्रेम यांपासून चार हात लांब आहे. पण ती तरी किती लांब राहणार यापासून आणि किती दिवस ? हुंडा मागू नका हुंडा देऊ नका इतकाच विचार समाजात रूढ झाला पाहिजे.

मूळ लेखिका: अमृता वाणी.
शब्दरचना: अजिंक्य भोसले
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

उरल काय आहे? True Love | मराठी लेख | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

शिक्षणातून आलेला छकीचा स्वाभिमान | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks

मधु चंद्र: कमी वयातले बालपण | PuneriSpeaks

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.