Dr Babasaheb Ambedkar Memorial: वेळ पडली तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू – मुख्यमंत्री

0
Dr Babasaheb Ambedkar Memorial: वेळ पडली तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू – मुख्यमंत्री

वेळ पडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलताना केले.

Dr Babasaheb Ambedkar Memorial

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे इतकं मजबूत आहे, ते कोणीही मोडू शकत नाही, तोडू शकत नाही, बदलू शकत नाही, ते कधीही बदलू शकत नाही. लोकांना खोटं सांगण्याची आवश्यकता नाही. गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.

रोज वाद करायला अनेक गोष्टी आहेत, पण मी हात जोडून विनंती करतो की बाबासाहेबांवर वाद करु नका. बाबासाहेबांमुळे आज राज्याची ही स्थिती आहे. त्यांच्यामुळे हे राज्य पुरोगामी बनलंय, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अशोक चव्हाण यांचे उत्तर
राज्य आधीच गहाण असताना अजुन कसे गहाण ठेवणार अशी टिपणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

तनुश्री दत्ता चा नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप

पुणे कालवा दुर्घटना : धाडसी महिला कॉन्स्टेबल कोण?

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.