देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पर्त्येक दिवशी २० हजार पेक्षा अधिक लोकांना कोरोन होत आहे. सरकार पुढील वर्षात लसीकरण करण्याचे नियोजन करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले कि भारताचा रिकव्हरी रेट सुधा इतर देशांपेक्षा चांगला आहे.
आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले, कि भारतात जानेवारी पासून लसीकरण सुरु होऊ शकते परंतु आमची प्राथमिकता हि लोकांची सुरक्षा आहे. त्यामुळे लसीचा प्रभाव कसा आहे त्यावर सर्व अवलंबून आहे. मला वैयक्तिक असे वाटत आहे कि, जानेवारी च्या कोणत्याही आठवड्यात भारत सरकार लोकांना लसीकरण करेल.
डॉ. हर्ष वर्धन काय म्हणाले,
VC: ANI
ते म्हणाले, इंग्लंड येथील नवीन कोरोना व्हायरस बद्दल जास्त घाबरून जाऊ नका कारण भारत या सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहे. भारतातील नागरिकांची सुरक्षितता हि सरकारची प्राथमिकता आहे.