आनंदवन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे (करजगी)
यांनी सोमवारी आत्महत्या केली आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी लोकांच्या सुश्रुषेसाठी स्थापन केलेल्या आनंदवन च्या शीतल आमटे मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या त्या कन्या आहेत.

नाव | डॉ. शीतल आमटे |
---|---|
जन्म | वरोरा, चंद्रपूर महाराष्ट्र |
मृत्यू | ३० नोव्हेंबर २०२०, वरोरा, चंद्रपूर महाराष्ट्र |
पती | गौतम कारजगी |
वडील | डॉ. विकास आमटे |
आई | डॉ. भारती आमटे |
आजोबा | बाबा आमटे |
मुलगा | शर्वील कारजगी |
प्राथमिक माहितीनुसार इंजेक्शन टोचून घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शीतल करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे
शीतल आमटे कोण होत्या?
दिव्यांगत्व तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर शीतल आमटे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO होत्या. सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

मशाल आणि चिराग अशा कार्यक्रमांची त्यांनी भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी उभारणी केली होती. मशाल आणि चिराग च्या डॉ शीतल आमटे संस्थापक होत्या. शारीरिक दिव्यांगत्व आलेल्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी कार्यक्रम आखले होते. यामध्ये विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन दिव्यांगत्व आलेल्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
शिक्षण आणि कारकीर्द
बाबा आमटे यांच्याकडून आलेला समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी डॉ. शीतल यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २०१३ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यावर त्यांनी न थांबता सामाजिक उद्योजकता चा अभ्यासक्रम देखील पुर्ण केला. हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशीपचा कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. सामाजिक कार्याची जोड देत शीतल या छायाचित्रकार, चित्रकार आणि पर्यावरण प्रेमी सुद्धा होत्या. त्यांनी मृत्यूआधी काढलेलं War & Peace हे चित्र सुद्धा प्रसिद्ध झाले आहे.

हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्था मधील आर्थिक नियोजन त्यांच्या हातात होते. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने मार्च २०१६ मध्ये यंग ग्लोबर लीडर म्हणून त्यांची निवड करत त्यांना सन्मानित केले होते.
वैवाहिक आयुष्य

2007 पासून गौतम कारजगी त्यांच्या आयुष्यात आले. तीन-चार महिन्यांच्या मैत्रीनंतर आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात करत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. नवऱ्यासोबतची सेव्हनस्टार लाईफस्टाईल त्यांना नकोशी वाटू लागल्याने त्यांनी गौतमसह आनंदवनला माघारी येण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी आनंदवनला स्मार्टव्हिलेज बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली होती.
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.