पुणे | मी काय विजय मल्ल्या आहे का? असा संतप्त सवाल बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी विचारलाय. गुंतवणूकदारांच्या पैशांसंदर्भात उत्तर देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मी कुणाचीही फसवणूक केलेली नाही. फसवणं आणि पैसे वेळेत परत न करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असं डीएसकेंनी म्हटलंय. मी विजय मल्ल्यासारखे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही.
माझं आयुष्य धुतल्या तांदळासारखं आहे. माझ्याविरोधात एकही तक्रार नव्हती. सर्वांचे पैसे परत मिळतील, असंही डीएसकेंनी यावेळी सांगितलं.
या बातमीवर तुमची कमेंट लिहा
Source