पुणे:
शिवसेनेच्या ‘टॉप स्कोअर्स’ या उपक्रमाअंतर्गत आदित्य ठाकरे पुण्यात आले होते. यानिमित्ताने संवाद साधताना शिक्षणाच्या दर्जाबाबत त्यांनी भाष्य केले.
‘चांगल्या समाजासाठी शिक्षण आवश्यक आहे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, मात्र शिक्षणाचा दर्जा, त्याचा ढासळता स्तर याबाबत विचार करावाच लागेल. शिक्षण कोणत्या भाषेतून घ्यायचे हा प्रश्न आहे. परीक्षांचे पेपर वेळेवर मिळतात का, ते का फुटतात, याबाबतही आता विचार करावा लागेल. काही शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असून स्वच्छतागृहे, माध्यान्य भोजन हे प्रश्न भेडसावत आहेत. त्यासाठी शिक्षण पद्धती आणि अभ्यासक्रमांची पुनर्बाधणी झाली पाहिजे. शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. शिक्षकांना केवळ शिकविण्याचे काम नाही; निवडणुकीचे काम, मतदार याद्यांचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात येते. त्यामुळे युवा सेनेकडून आता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या प्रश्नावरही लक्ष घालण्यात येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
कोंढवा येथील संत गाडगेबाबा विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. गुण पाडण्यासाठी धडपडू नका, आपण काय शिकतो हे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना गोड सल्ला दिला.
News Source
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज : आदित्य ठाकरे
