एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी प्रवेश करताना “तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल” असे उद्गार केले आणि अनेकांना प्रश्न पडला की नक्की सीडी प्रकरण आहे तरी काय?

एकनाथ खडसे हे गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठे काम करत होते. भूखंड घोटाळ्याच्या झालेल्या आरोपानंतर त्यांना पक्ष कामकाजातून सतत डावलल्यामुळे ते अनेक दिवस नाराज होते. अखेर खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीचा हात पकडला आहे. त्याआधी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मी पक्षावर नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सुडपणाच्या वागण्यामुळे नाराज आहे असे ते म्हणाले होते. तर आपण जाणून घेऊयात हे सीडी प्रकरण नक्की आहे तरी काय?
एकनाथ खडसे सीडी प्रकरण आहे तरी काय?
एकनाथ खडसे यांनी भाषण देत असताना “मी जर तोंड उघडले तर अनेकांना हादरे बसतील” असे वक्तव्य करून पक्षातील लोकांना दम दिला होता. त्यांच्याकडे पक्षातील काही नेत्यांचे खाजगी कागदपत्रे आणि सीडी असल्याचे ते म्हणाले होते. या सीडी मध्ये भाजपमधील मोठे नेते आहेत. खडसे असे सुद्धा म्हणाले होते की हे व्हिडीओ त्यांनी वरिष्ठ नेत्यांना दाखवले आहेत आणि त्यांच्याकडे न्याय मागितला आहे. या सीडी मध्ये खाजगी व्हिडीओ असून वेळ आल्यावर ते महाराष्ट्रासमोर प्रसिद्ध करू असे ते म्हणाले. त्यांच्याकडे काही कागदपत्रे सुद्धा आहेत ज्यात भाजप नेत्यांचे गुप्त व्यवहार आहेत.
या व्हिडिओ सीडी आणि कागदपत्रांमुळे अनेकांना हादरे बसतील अशा गुप्त बाबी यात आहेत.
ABP माझा मध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुद्धा खडसेंनी या सीडी चा उल्लेख केला होता.
खालील मुलाखतीच्या ३५.३७ मिनिटानंतर खडसेंनी व्हिडिओ क्लिप्स आणि कागदपत्रे यावर विधान केले आहे
आता नाथाभाऊ ही सीडी, कागदपत्रे केव्हा महाराष्ट्रासमोर आणणार हे पहावे लागेल. यात कोनाकोणाची नावे येतात हे समजण्यासाठी वाट पहावी लागेल.
एकनाथ खडसे राजकीय कारकीर्द:
1988 – कोथळी गावचे सरपंच
1990 – मुक्ताईनगर चे आमदार बनले
1997 – BJP-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री
2010 – विरोधी पक्षनेतेपदी निवड
2014 – BJP सरकारमध्ये महसूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री
2016 – महसूल मंत्रिपदावरून राजीनामा
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.
PuneriSpeaks is now on Telegram. Click here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.