टेड टॉक्स, मुंबई:
टेलिव्हिजन विश्वावर गेली काही वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या एकता कपूरचा ज्योतिष आणि अंकशास्त्रावर खूप विश्वास असल्याचं तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. मेहनत, कामाप्रती असलेले समर्पण आणि निर्णयक्षमता ती नेहमी जोतिषींनी सुचवलेल्या अंगठ्या, दागिने परिधान करून वावरत असल्याचे आपण पाहिले असेलच. युरोप-अमेरिका मध्ये गाजलेल्या ‘टेड टॉक्स‘ नुकताच भारतात चालु झाला असून शाहरुख खान त्याचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात एकता ला बोलावल्यानंतर तिने बोलण्यासाठी एक वेगळीच मागणी केल्याचे कळतेय.
ज्योतिषाने एकताला कार्यक्रमात फक्त पाच मिनिटे आणि चाळीस सेकंदच बोलण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती ‘मिड डेय‘या वृत्तपत्राने दिली आहे. हा ठराविक कालावधी तिच्यासाठी योग्य असून यापेक्षा जास्त किंवा कमी न बोलण्याचा सल्ला जोतिषींनी तिला दिला आहे. तर एकतानेही त्यांचा सल्ला ऐकत ‘टेड टॉक्स’मध्ये या वेळेतच बोलणार असल्याचे सांगितले आहे. तिच्या या विचित्र मागणीवर शाहरुखचे काय म्हणणे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
©PuneriSpeaks