आता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन

0
आता ‘१००’ क्रमांक होणार बंद, आता देशपातळीवर एकच हेल्पलाईन
Share

देशातील अनेक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याची आपत्कालीन हेल्पलाईन सुविधा क्रमांक बदलणार आहे. पोलिसांना संपर्क साधायचा असल्यास १०० क्रमांक इतिहासजमा होणार आहे.

पोलिस, अग्निशमनदल व महिला हेल्पलाइन यांसारख्या मदत मिळण्यासाठी ‘११२’ ही नवीन हेल्पलाईन तयार करण्यात आलेली असून ३१ डिसेंबर पर्यंत नवीन हेल्पलाईन सुरू करण्याचे आव्हान महाराष्ट्र पोलिसांपूढे आहे. देशपातळीवर एकच हेल्पलाईन असावी यासाठी हा नवीन क्रमांक तयार करण्यात आला आहे. नवीन सुविधा उपलब्ध होईपर्यंत ‘१००’ क्रमांक सुरू राहणार आहे.

अमेरिकेसारख्या देशात ‘९११’ क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला कोणतीही मदत मिळू शकते. असेच भारतात करता यावे यासाठी एकाच हेल्पलाईन क्रमांकाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्षाअखेरीपर्यंत राज्यात सर्वत्र ‘११२’ हेल्पलाइन कार्यान्वित करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. राज्यातील पोलिसांना पोलिस प्रशिक्षण केंद्रातून टप्प्याटप्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीने संपर्क केल्यास अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, महिला हेल्पलाइन, लहान मुले हेल्पलाइन यांना एकाच वेळेस पाचारण करणे सोप्पे होणार आहे. ज्या प्रकारचे घटना त्यानुसार त्या विशिष्ट यंत्रणेला माहिती देऊन व्यक्तीला ताबडतोब मदत मिळू शकते.

दिल्ली निर्भया प्रकरणानंतर देशात एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याबाबत सूचना केल्या होत्या, यानुसार देशभरात एकच आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक राज्यांनी याचा अवलंब केला असून आता महाराष्ट्र देखील नवीन क्रमांक स्वीकारणार आहे.

एकाच वेळी पीडितांना मदत मिळावी यासाठी केंद्र पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ११२ ही हेल्पलाइन सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. सेंट्रलाइज कंट्रोल रूम मध्ये ७० ते ८० प्रशिक्षित लोक काम करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्व प्रकारची मदत पोहोचविली जाईल. ‘११२’ सुरू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांकही क्रमांकही सुरू ठेवण्यात येणार आहे.

एस. जगन्नाथन, अप्पर पोलिस महासंचालक तथा नोडल ऑफिसर सेंट्रलाइज हेल्पलाइन सिस्टिम

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.