Fact Check: +140 क्रमांकावरून आलेला कॉल हॅकर चा आहे का?

0
Fact Check: +140 क्रमांकावरून आलेला कॉल हॅकर चा आहे का?
Spread the love

सध्या सगळीकडे +140 क्रमांकावर आलेला कॉल उचलू नये नाहीतर आपल्या बँक खात्यातील पैसे जाऊ शकतात अशा प्रकारचे संदेश फिरत आहेत. यात किती सत्य आहे हे आपण तपासून पाहणार आहोत.

असे स्टेटस अनेक जण आपल्या Whatsapp वर ठेवत आहे

Fact Check: +140 क्रमांक कॉल आल्यास पैसे जाऊ शकतात?

महाराष्ट्र सायबर खात्याने याबाबत खुलासा केला असून या संदेशात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. जरी आपल्याला अशा क्रमांकावरून कॉल आला तरी जोपर्यंत आपण, बँक अकाउंट डिटेल्स, ओटीपी अथवा क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे पूर्ण नंबर तसेच सी. व्ही. व्ही./ पिन नंबर शेअर करीत नाही तोपर्यंत आपल्या बँक खात्याला कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. नुसता कॉल आल्याने किंवा उचलल्याचे आपल्या बँक खात्यातून पैसे जाऊ शकत नाहीत.

जर आपल्याला +140 वरून कॉल आल्यास काय करावे?

जर आपणास 140 ने सुरुवात होणाऱ्या क्रमांकावरून फोन कॉल आला तर घाबरु नये/ पॅनिक होऊ नये. हे क्रमांक टेलिमार्केटिंग करिता दिले गेलेले असतात. परंतु हे देखील लक्षात ठेवावे की, अशा किंवा इतर कोणत्याही क्रमांकावरून फोन कॉल आल्यास व ओटीपी सह आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स, डेबिट/ क्रेडिट कार्ड डिटेल्स जर कोणी विचारत असेल तर आपण आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती, डेबिट/ क्रेडिट कार्डची माहिती अथवा पिन नंबर/ ओटीपी देऊ नये अथवा दिला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

महाराष्ट्र सायबर खात्याने याबाबत घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. सायबर ने सांगितल्याप्रमाणे अशा क्रमांकावर कॉल आल्यास आपल्या खात्यातील पैसे जाणे अशक्यच आहे. फक्त आपण आपली माहिती पुढच्या व्यक्तीला देऊ नये. आपल्या खात्याबाबत कोणतीही माहिती आपण दिल्यास आपल्या खात्याची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अनेकवेळा बँकेतून बोलत असल्याचे भासवत आपल्या खात्याची माहिती घेऊन पैसे काढल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Biz news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.