रातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक

0
रातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक

खेळणी विकणाऱ्या Famous Toy Seller फेमस विक्रेत्यांचा धंदा बंद, रातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ वायरल झाला होता. ज्यात एक लहान मुलांची खेळणी विकणारा विक्रेता एका विशिष्ट अंदाजात आपली खेळणी विकत होता. कधी मोदींचे नाव घेऊन तर कधी राहुल, मुलायम यांच्या नावाची जुगलबंदी करत आपल्या बोलण्यातून लोकांना खेळणी विकताना पाहिले होते. त्याच्या या विशिष्ट अंदाजाने खेळणी विक्रेत्याला रातोरात प्रसिद्ध बनवून टाकले.

Worlds Famous Toys Seller in Train Video

 

त्याच्या या वायरल झालेल्या व्हिडिओ नंतर लोक त्या विक्रेत्याला ओळखू लागले. जिथे भेटेल तिथे त्याच्याबरोबर सेल्फी घेऊ लागले, व्हिडिओ काढू लागले. प्रसिद्धीची लत चांगली नसते म्हणतात तेच खरे… आणि हीच प्रसिद्धी त्या विक्रेत्याला पचनी पडलेली नाही.

लोकांच्यात प्रसिद्ध झालेला खेळणी विक्रेता अवधेश दुबे सर्वांच्यात दिसून येऊ लागला. यातच रेल्वे फोर्स चे लक्ष अवधेश दुबे वर गेल्याने त्याचे शनीचक्र चालू झाले. रेल्वे फोर्स ने त्याला पकडल्यानंतर समजले की त्याच्याकडे रेल्वे मध्ये सामान विक्री करण्याचा परवाना नाहीये. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याला अटक केली. त्याला 10 दिवसांची कोठडी आणि 3000 रुपये दंड आकारण्यात आला. एका व्हिडिओ ने प्रसिद्ध झालेल्या अवधेश दुबे ची विक्री थांबल्याने त्याला या प्रसिद्धीचा फायदा न होता नुकसानच जास्त झालेले पाहायला मिळत आहे. अवधेश दुबे ने याचे खापर सुद्धा मीडियावर टाकले असून त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करणे योग्य आहे काय? आपल्याला काय वाटते आम्हाला नक्की कळवा.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

राज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता

JCB Memes: Why JCB Memes Gone Viral

अबब! मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.