शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी, गाईच्या दुधाला मिळणार 25 ₹ खरेदीदर

0
शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी, गाईच्या दुधाला मिळणार 25 ₹ खरेदीदर

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मुुळे आता राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देणार असल्याची घोषणा दुग्ध व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.

दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी, यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ राज्यभरात आंदोलन करत होती. हे नवे दर 21 जुलैपासून लागू होणार असल्याचे दुग्ध व्यवसायमंत्री महादेव जानकर म्हणाले.

या प्रश्‍नावर आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला आहे. अधिवेशन सुरू असल्याने यासंदर्भातील निर्णय सभागृहातच जाहीर झाला. दुध संघांनाही हा दर मान्य असल्याचे जानकर म्हणाले.

दूध दरासाठीच्या आंदोलनात सहभागी होत राज्यभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते. यात रस्त्यावर दूध ओतून देणे, गाईलाच दुधाचा अभिषेक घालणे, स्वत: दुधाने आंघोळ करणे, मोफत दूधवाटप, दुधाचे टॅंकर फोडणे असे प्रकार घडले. यावरून काहींनी टीका केली तर काहींनी आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याचे दिसत आहे.

यावर खासदार राजु शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली नसून पुढे आंदोलनाचे काय होणार हे अस्पष्ट आहे.

दुधाला अनुदान देण्याच्या निर्णयाबद्दल आपणास काय वाटते आम्हास नक्की कळवा…

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती: बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी….

मोबाईल एअरबॅग केस डिज़ाइनचा शोध, पडताच स्वयंचलितरित्या उघडून मोबाइलला वाचवणार

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.