बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

0
बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

बाप शेतामध्ये उन्हात राबतोय, पोरगा फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करतोय

चैत्र महिना संपत आला आहे, मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रखरखत्या उन्हात पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतकरी राबत आहेत. आज जवळपास ४२ डिग्री सेल्सीअस पर्यंत तापमान गेले असून शेतकरी या उन्हात राबत असताना त्यांची मुले मात्र फेसबुक, व्हॉटसअप वर जाळ धूर करण्यात व्यस्त आहेत. याचा जय त्याची मापं काढण्यात व्यस्त आहेत. फादर्स डे, मदर्स डे ला उमलणारे प्रेम मात्र या उन्हात आई-बापाला विश्रांती देण्यास पुढे येत नाहीत. तरुण मुलांनी आपापल्या आई-बाप यांना विश्रांती देत स्वतः पुढे येत काम केले पाहिजे.

आजकाल शेती करण्यापेक्षा कुठेतरी हमाली केलेली बरी अशी म्हणण्याची वेळ आली असून शेतमजुरांची कमतरता भासत आहे. वयात आलेली पोर गावभर हुंदडत कोणाच्या तरी मागे फिरत आपले तत्त्वज्ञान झाडत फिरत आहे. दिवसभर रानात राबणाऱ्या आपला बाप याला मदत करण्याऐवजी पोरग गावभर फिरत कोणाच्यातरी हुजर्या करत आपले दिवस घालवत आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर आपल्याला जास्तीत जास्त लाईक कशा मिळतील यावर आपले कष्ट मापत आहे. हि गोष्ट चिंतनीय असून यावर मुलांनी स्वतःच चिंतन करण्याची वेळ आली आहे. शेतकरी बापाने पोरास काही सांगावयास गेल्यास तो बापालाच उलट शब्दांमध्ये बोलत आहे. शेतातून कसेबसे घर चालत असताना शेतमजूर लावावेत तर स्वतःला काय शिल्लक राहणार अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

विशीत आलेली मुल आम्ही शेतकरी असून स्वतः शेतात उतरायचे सोडून शेतकऱ्यांसाठी तळमळ असल्याचा आव आणत आहेत. आज बाजारात ४-५ हजारात मोबाईल भेटत आहेत त्यामुळे मुल ते मोबाईल घेऊन टवाळखोरी करत आपले दिवस घालवत आहेत. कोणत्यातरी नेत्याला आपला देव माणून त्याचा जयजयकार करत दिवस ढकलत आहेत. मुलांनी आपल्या बापाची व्यथा समजून बापाला हातभार लावत शेतीची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आपल्या मुलाने शेतीचा सांभाळ करावा अशी अनेक पालकांची इच्छा असते परंतु मुले जबाबदारी घेण्याऐवजी पालकांनाच मजूर म्हणून राबवत स्वतः गावभर फिरत आहेत. याचा कुठेतरी विचार व्हायला हवा….

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील…..!!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुवर्ण ट्रॉफीवर संस्कृत मध्ये काय लिहिले आहे?

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.