बाप: बा माझा हाडाचा शेतकरी
ज्ञानेश्वर पवार यांनी Fathers Day निमित्त लिहिलेला ब्लॉग
माझा बा #प्रेमळ होता तसाच रागीट पण खुप होता.काही ऐकले नाही, उलट उत्तर दिले, बाहेर कुणाबरोबर भांङण केले की मार ठरलेला.अगदी काठीचे वळ #पाठीवर उठेपर्यंत..
बा माझा हाङाचा #शेतकरी. काळ्या मातीत बी पेरताना स्वप्न बी पेरायचा. लय जीव त्याचा काळ्या मातीवर..#बाप pic.twitter.com/iR5cIF7DcC
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
शेतकऱ्यांचा पोरगा हाय तू त्यामुळं शेतात काम करायला अजिबात लाजायचं नाय.अंगातून घाम गाळला तरच वावरात पीक जोमाने येतयं ही त्याची धारणा. मी त्यांना नाना बोलायचो.
शाळेची फी भरायला बा कडे पैसे नसले की बा कुणाकडून तरी पैसे उसने आणून द्यायचा.पण पैशाला कधी नाय बोलायचा नाय..
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
धाकटी बहीण सोनाली ती माझ्यापेक्षा लहान हाय चार वर्षांनी.तिला तर अगदी काळजाच्या तुकङ्यासारखा जपायचा तो.तिची मी काय खोङ काढली की मार तर ठरलेलाच.खुप लाङकी लेक त्याची.
बा चा सोनावरच लय जीव हाय अन् माझ्यावर नाय ही माझी तक्रार बा कडे.बा तसे म्हणल्यावर मायेने जवळ घ्यायचा..
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
बा बोलायचा लग्न झाल्यावर ती सासरी जाणार हाय तु कायम हितंच राहणार हाय,अशी माझी प्रेमळ समजुत घालायचा. थंडीत आम्ही गाढ झोपलेलो असताना बा माझा #वावरात दारी धरत असायचा..
कष्टाचा #ङोंगर उपसून पण बा चा खिसा कायम रिकामाच असायचा,तरी चेहऱ्यावर त्याच्या कायम #हास्यच असायचे.
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
त्याच्या सुरकुत्या पङलेल्या चेहऱ्यावरून आयुष्याचा अनुभव ओसांङून वाहायचा.
त्याच्या टपोर्या डोळ्यांमध्ये खोल खोल पाहून त्याच्या मनाचा तळ शोधायचा प्रयत्न करायचो मी.
काम करून हाताला पङलेलं घट्टे पाहून ङोळ्यांचे आभाळ भरून यायचं माझ्या..
कितीबी दुखं आली तरी माझा बा शांतच.— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
आईच्या माघारी तर बा च आमचा माय बाप झाला. ङोंगराएवढी दुखं मनात साठवून पण त्याची आम्हांस्नी कधीच जाणीव पण करू दिली नाय..
आले घातलेला #चहा लय आवङायचा त्याला. खुप भारी चहा करायचा तो. ती चव आजपण जिभेवर तशीच हाय अजून..
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
जिवघेण्या आजाराशी लढला लढला अन् बिनभोभाटपणे निघून गेला.अगदी कायमचा..
११ वर्ष झाली त्याला जाऊन पण त्याची आठवण कधी कमी नाय झाली.मोठी मोठी संकटे आली की हटकून बा ची आठवण येते.जन्मताच जे अनाथ असतात त्यांच्यापेक्षा मी वयाच्या १७ व्या वर्षी अनाथ झालो एवढेच काय ते मनाला समाधान..
— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
ताय माझी #बेभान होऊन
रङत होती..बा ची #चिता समोर,
जळत होती..तेव्हा कुठे गड्यांनो मला, #जिंदगी थोडी थोडी
कळत होती…— ज्ञानेश्वर पवार (@Pawardny) June 17, 2018
ज्ञानेश्वर पवार यांनी लिहिलेला ब्लॉग आपणांस कसा वाटला आम्हाला नक्की कळवा…
©PuneriSpeaks
अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.