कोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…

0
कोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी…
Share

भारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या वेषभूषाकार भानू अथैया यांच्याविषयी माहिती आपण वाचणार आहोत. त्यांचे गुरुवारी (१५ ऑक्टोबर,२०२०) मुंबईत निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या.

कोल्हापूर ते मुंबई: पहिल्या भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया (राजोपाध्ये) यांच्याविषयी...
  • जन्म: २८ एप्रिल १९२९, कोल्हापूर
  • मृत्यू: १५ ऑक्टोबर २०२०, मुंबई
  • पती: सत्येंद्र अथैया
  • पुरस्कार: Academy Award for Best Costume Design, National Film Award for Best Costume Design
  • वडील: अण्णासाहेब राजोपाध्ये
  • आई: शांताबाई राजोपाध्ये

गुरुवारी पहाटे (१५ ऑक्टोबर, २०२०) त्यांचे निधन झाले. आठ वर्षांपूर्वी त्यांना मेंदूत एक ट्यूमर असल्याचे निदान झाले होते. गेली तीन वर्षे त्या अर्धांगवायूमुळे अंथरुणावर खिळल्या होत्या. त्यांचे अंतिम संस्कार दक्षिण मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत झाले.

भानू अथैया यांच्याविषयी माहिती

भानु अथैया यांना १९८२ साली “गांधी” चित्रपटात केलेल्या पोशाख डिझाईन कामासाठी बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन ऑस्कर मिळाला होता.

कोल्हापुरात जन्मलेल्या भानू अथैया यांनी आपली कारकीर्द ५६ वर्षे चांगलीच गाजवली आहे. त्यांनी आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केले आहे.

भानू अथैया यांच्याविषयी माहिती गांधी चित्रपट

चित्रपट काम

लगान, स्वदेश, सीआयडी, प्यासा, कागज के फूल, वक्त, आरझू, आम्रपाली, सूरज, अनिता, मिलान, रात और दिन, शिकार, सत्यम शिवम सुंदरम, तीसरी मंजिल, मेरा साया, अभिनेत्री, जॉनी मेरा नाम, गीता मेरा नाम, अब्दुल्ला, कर्झ, एक दुजे के लिए, रझिया सुल्तान, निकाह, अग्निपथ (१९९०), अजूबा आणि १९४२ – एक प्रेमकथा अशा १०० हुन अधिक चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाईन केले आहेत.

जन्म, आई-वडील यांच्याविषयी

भानू अथैया यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला होता. अण्णासाहेब आणि शांताबाई राजोपाध्ये यांना जन्मलेल्या सात मुलांपैकी ती तिसरी होती. भानू चे वडील अण्णासाहेब चित्रकार होते. अथैया नऊ वर्षाची असताना त्यांचा मृत्यू झाला. भानू अथैय्या यांच्या आईचे नाव शांताबाई होते. वडील अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली.

बालपण आणि शिक्षण

भानू बालकलाकार म्हणून ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात देखील काम केले आहे. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला.

बॉलीवूड मध्ये कामाला सुरुवात

१९६० दशकात टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्ह्ज वीकली’ मधील भानू यांची रेखाटने पाहिल्याने अभिनेत्री नरगिस खूप प्रभावित झाल्या. नरगिस यांच्या मुळे भानू यांना राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ चित्रपटासाठी वेशभूषा साकारण्याचे काम मिळाले आणि त्याच्या कामाला वेग आला. त्यांनी अमोल पालेकरांच्या मराठी चित्रपट ‘महर्षी कर्वे’ साठी सुद्धा वेषभूषा केली होती

पहिला भारतीय ऑस्कर विजेत्या कशा बनल्या भानू अथैया

पहिला भारतीय ऑस्कर विजेत्या भानू अथैया मराठी

रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटाच्या वेषभूषेसाठी त्यांना संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथैय्या यांना प्रतिष्ठित ऑस्कर पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक त्यांना मिळाले होते.

ऑस्कर परत का केला?

ऑस्कर हा पुरस्कार सोनं आणि जस्त या दोन धातूंपासून बनवलेला असतो. अनेकवेळा कलाकार आर्थिक अडचणीत असताना मानाचा पुरस्कार विकल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अनेकवेळा पुरस्कार चोरीला जातात. त्यांच्या मृत्यूनंतर पुरस्काराची योग्य काळजी कोण घेणार असे अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. 

या सर्व कारणांमुळे सुरक्षेसाठी अखेर त्यांनी २०१२ मध्ये भारताचा ‘पहिला ऑस्कर’ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस संस्थेला परत केला आहे. संस्थेने देखील हे सन्मानचिन्ह त्यांच्या संग्रहालयात ठेवला आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

PuneriSpeaks is now on TelegramClick here to join our channel and stay updated with the latest Big news and updates.

अजुन वाचण्यासाठी:

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.