शंका-कुशंका: लग्नानंतरची पहिली रात्र | अजिंक्य भोसले

3
शंका-कुशंका: लग्नानंतरची पहिली रात्र | अजिंक्य भोसले

शंका-कुशंका

मी अविनाश. आणि आज माझ लग्न झाल. माझी बायको प्रिया. आज आम्ही दोघ एकत्र झालो. आमच प्रेम नाही. आम्ही रिलेशन मध्ये ही नव्हतो. आमच ठरवून लग्न झाल आहे. आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. ती थोड्यावेळाने येईल माझ्या रूम मध्ये. आता आजपासून माझी ही रूम आमची होईल. आज आमचा मधुचंद्र आहे. कस होईल? काय होईल? आणि निट सगळ होईल का? या विचारासोबत मनात एक धाकधूक पण होतीय.

बर ती आलीय…

अविनाश आणि प्रिया दोघ बेडवर बसलेले. दोघात शांतता. कोण पहिलं बोलेल या विचारात दोघ हि बोलत नाहीत. आणि ती तयारी दाखवते. स्वतःला सावरून बसलेली प्रिया मोकळ्या अंगाने बसते. तो तिच्या जवळ जातो पण तिला सांगतो, काही गोष्टींना आपण आत्ताच बोलून मोकळ्या मनान प्रणय करू. त्या आधी थोड बोलू. ती होकार देते.

अविनाश: प्रिया. मी या आधी एका मुलीवर प्रेम केल आहे. आणि अजून करत आहे. तीच नाव सायली आहे. या माझ्या जॉब आणि जॉबमूळ बाहेरच्या कामात माझ तिच्याकड दुर्लक्ष झाल. तिला माझ्याशी लग्न करायचं होत. पण तीची आणि माझी जात वेगळी. त्यामुळ तिच्या भावाने नकार दिला. ती एका रात्री मागच्या ख्रिसमसला पार्टीसाठी बाहेर आली, पण डायरेक्ट माझ्याकड आली. मी काय कराव समजत नव्हत मला. अशात कुणीतरी तिच्या घरी टीप दिली आणि तिला तिचा भाऊ घेऊन गेला. परत आम्ही एकमेकांना बघितल नाही. बोलण झाल नाही. पण तिन अजून लग्न केल नाहीये. माझ्यासाठी तिन नकार दिलेत. आणि मी इथ तिला सोडून तुझ्याशी लग्न केल. मी तुला फसवल आणि तिला सुद्धा. मला समजेना मी काय करू.

प्रिया: मी ही एका मुलावर प्रेम केल आहे. तो माझ्याहून तीन वर्षाने लहान आहे. पण विचारांनी खूप छान आहे. म्हणजे मला जे कळत नाही ते तो मला समजावून सांगायचा. खुप काही मला शिकायला मिळाल त्याच्याकडून…. कधी वाटल नव्हत मला कि मला कोणी बदलवणारा भेटेल. त्यान माझ्यात खूप बदल केला. पॉजीटीव्ह झाले मी खूप. आमची मैत्री होती अस हि म्हणता येत नाही. कारण आम्ही फक्त फोनवर बोलायचो. कधीतरी भेटायचो गप्पा मारायचो. अशात त्याला मी आवडले. पण त्यान मला सांगितल नाही. पण प्रत्येक भेटीत मला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसायचं. मी त्याची वाट बघत होते. तो कधी मला प्रेमाची कबुली देईल पण त्यान दिली नाही. आणि अशात कधी माझ लग्न ठरलं कळाल नाही. तो माझ्याशिवाय नीट नाही जगणार. मी काय करू हा प्रश्न मला पडला आहे. म्हणजे मीही त्याला फसवल्यासारख केलय. त्याच प्रेम मी समजून घेतल नाही या विचाराने तो रडत बसेल. कस सांगू मी त्याला? कि मी प्रेम ओळखलं आहे त्याच.

अविनाश: आता? म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेमात सारखेपणा आहे. मी तिच्यासोबत खुपदा सेक्स केला आहे. त्यामुळे आमच्यात जे नात तयार झालय त्याला मी विसरू नाही शकत.

प्रिया: मी नाही कधी केल तस कुणासोबत. मला तो आवडला पण आमच्यात काहीच घडल नाही.

अविनाश: या क्षणा नंतर मला वाटत आपण एकत्र येऊ शकतो का आता ?

प्रिया: हो नक्कीच आपला भूतकाळ हा न विसरता येण्यासारखा आहे. पण त्या दोन व्यक्तींसाठी आपण दोन्ही घरातल्या एवढ्या लोकांच मन मोडू शकत नाही. समजाचा हि आपण विचार करायला हवाच. आणि हो तू सायलीवर तितकच प्रेम करत राहशील आयुष्यभर जितक मी अजिंक्यवर करेन. आणि हे प्रेम कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात कायम असेल. आणि आपण दोघ हि प्रेम करू शकतो.

बोलण सुरु असत.

तर अस हे आमच बोलण सुरु असताना बऱ्याच आठवणीना उजाळा देत आम्ही दोन पर्यंत जाग होतो. नंतर ती झोपली. आणि मीही मग झोपून गेलो. मनातल्या सगळ्या शंका-कुशंका निरस झाल्या. आणि नकळत त्या मनमोकळे पणाचा परिणाम म्हणा किंवा काहीही. सकाळी मला पहिली जाग आली तेव्हा तिचा हात माझ्या कमरेवर अलगद पडलेला होता. आणि माझा हात तिच्या हातावर होता….

(कल्पना करेल तितकी बनत जाते. त्यातलीच ही एक कल्पना)

लेखक: Artista Ajinkya Bhosale
संपर्क: 7558356426

©PuneriSpeaks

कोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

दुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

मैत्रीण

रहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं

मी म्हणतो का कराव प्रेम

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.