फ्लोरिडा पार्कलँड हत्याकांड: १९ वर्षीय निकोलस क्रुझ ला अटक

0
फ्लोरिडा पार्कलँड हत्याकांड: १९ वर्षीय निकोलस क्रुझ ला अटक

फ्लोरिडा पार्कलँड मधील आपल्या माजी हायस्कूलमध्ये सशस्त्र हल्ला केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. फ्लोरिडा पार्कलँड हत्याकांड मध्ये आत्तापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असुन १४ जण जखमी आहेत.

Nikolas cruz

फ्लोरिडा पार्कलँड हत्याकांड चालु असतानाचा व्हिडिओ

संशयित, १९ वर्षीय निकोलस क्रुझ या तरुणाला जवळच्या कोरल स्प्रिंग्समध्ये अटक करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी हत्याकांडानंतर मारझोरी स्टोनमेन डग्लस हायस्कूलमधून पळालेल्या गर्दीत त्याने स्वतःला लपवून पलायन केले होते.

ब्रोवाड काउंटी शेरीफ स्कॉट इझरायल यांनी सांगितले की, बंदुकधारकाने एआर-15 शैलीतील अर्ध-स्वयंचलित रायफल आणि अनेक मासिके घेऊन सशस्त्र हल्ला केला होता.

अमेरिकेत पुन्हा एकदा या सशस्त्र हल्ल्यानंतर शस्त्र परवाण्यावर फेरविचार करण्याबाबत जनमानसात मत होताना दिसत आहे.

भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने सुद्धा याबाबत आपले म्हणजे परखडपणे मांडले आहे.

शस्त्र परवाना देण्याबाबत सक्त कायदा व्हावा असे मत अनेकांनी यावर मांडले.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्याची किंमत मोजावी लागेल” संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची पाकिस्तानला चेतावणी

Trending Video: इंटरनेटवर धुमाकूळ घालणारी ती मुलगी कोण? तो व्हिडिओ कोणत्या चित्रपटातला?

Rohan More Swimmer from Pune becomes Youngest and First Asian Swimmer to complete Seven Ocean Challenge

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.