नेहा आम्हाला माफ कर !

0
नेहा आम्हाला माफ कर !

नेहा आम्हाला माफ कर ! Forgive us Neha Suri !

Neha Suri killed Drug officer

नेहा सुरी या पंजाब विभागीय ड्रग लायसन्सिंग अ‍ॅथॉरिटीच्या प्रमुख पदी असलेल्या व आपल्या पारदर्शक, प्रामाणिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रशासकीय अधिकारी, यांची आज ऑफिस मध्ये काम करत असताना हत्या करण्यात आली. एका केमिस्टने अवैध औषधे ठेवल्या बद्दल त्याचा परवाना रद्द केल्याच्या रागातून या केमिस्टने नेहा सुरी यांचा खून केला. आज नेहाच्या छातीवर लागलेली गोळी आपल्या कोणाच्याही छातीवर कशी आणि कधी येईल याचा आपल्याला अंदाज ही नाही. या हत्येबद्दल कुठेही सर्वसामान्य, बुद्धीवंत, माध्यमे यांच्यात कुठेही टीकेची, संतापाची लाट दिसत नाही. एरवी ट्वीटर वर मोहिमा राबवणारे, रस्त्यावर मेणबत्या पेटवणारे सगळे विझले आहेत! चौकीदार वगैरे चर्चा ठीक आहे, पण या प्रामाणिक चौकीदारांच्या बलिदानावर फक्त आपण लिहित राहायचे का? आज प्रामाणिक अधिकाऱ्यांना ‘बघा, तुमचा नेहा सुरी करू’ म्हणून मनातल्या मनात प्रत्येक क्षेत्रात फोफावलेले माफिया हा मृत्यू साजरा करत असतील! त्यांचे राजकीय साथीदार, पक्षात निवडून येणारा कोणी भेटतोय का हे शोधत फिरणारे, दोन मिनिटे अभिनय करून दुख व्यक्त करतील! वर्षानुवर्षे ही केस सुरु राहून कदाचित हा हत्या करणारा केमिस्ट मानसिक रुग्ण होता हे न्यायालयात सिद्ध होऊन त्याची निर्दोष सुटका होईल. आणि अवैध औषधांच्या विक्रीमुळे व्यसनाधीन झालेल्या तरूण मुलांचे आम्ही उपचार करत राहू, प्रसंगी अवैध औषधांमुळे, अवैध गर्भपाताच्या गोळ्या खाऊन मृत्यूमुखी पडलेल्या एखाद्या स्त्रीचे डेथ सर्टिफिकेट भरत राहू. नेहा चा मृत्यू हे गेल्या ७९ वर्षाच्या कुचकामी अन्न औषध प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे जसे पाप आहे, तसे ते या पापात आपला सर्वांचाही वाटा आहे! नेहा सुरीच्या मृत्यू साठी एरवी आपल्या मागण्यांसाठी संपावर जाणारे केमिस्ट किंवा कोणीही संपावर जाणार नाही कि कोणी निवडणुकीचा प्रचारही बाजूला ठेवणार नाही! कारण नेहा आपली कोण लागते ना ? नेहाला श्रीदेवी सारखे तिरंग्यात लपेटून शेवटची मानवंदना ही मिळणार नाही, कारण अस काय मोठं काम केलं तिने प्रामाणिकपणासाठी जीव देऊन?

म्हणून, नेहा आम्हाला माफ कर !

एकच कर, परत शक्यतो माणसाचा जन्म घेऊ नको आणि मिळालाच तर या भारतात जन्माला येऊ नको … !

इथे न कुणाला तुझ्या जन्माची किंमत आहे, न तुझ्या मृत्यूची!!

– डॉ. अमोल अन्नदाते
www.amolannadate.com
reachme@amolannadate.com

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे2018

टाटा समूह माहिती: देशाच्या प्रगतीचा वसा घेतलेले ध्येयवेडे टाटा !

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.