इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

0
इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ब्राझीलच्या ट्रकवाल्यांनी लढवली नामी शक्कल, सरकारची आणीबाणीची घोषणा

ब्राझील मधील साओ पावलो शहरात 25 मे रोजी आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी ट्रकधारकांनी ब्राझीलच्या महामार्गांवर पाचव्या दिवशी रस्तारोखो केला आहे.

आणीबाणीच्या परिस्थितीमुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन सेवांकरिता चालणारे इंधन यासारख्या वस्तू जप्त करण्यात सरकारला परवानगी मिळणार आहे. ट्रक आंदोलनामुळे देशभरातील उपभोक्ता वस्तूंची लक्षणीय टंचाई उद्भवली आहे.  ब्राझीलच्या सरकारने शुक्रवारी लष्करी अधिकार्यांना ट्रकवाल्यांनी विरोध करून महामार्गावरील केलेल्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी पाचारण करण्याची मंजुरी दिली.

ट्रकवाल्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सर्व रस्ते बंद होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भारतातील करपद्धत ब्राझीलशी मिळतीजुळती असून सरकारने इंधनावर जवळपास ५०% कर लावला आहे. हा कर कमी करण्यासाठी सर्व ट्रकवाल्यांनी दरवाढीचा विरोध केला. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून सरकार १०% पर्यंत दर कमी करण्यास तयार झाली आहे.

©PuneriSpeaks

अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाटि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.

अजुन वाचण्यासाठी:

पेट्रोल डिझेल च्या किमती भडकणार, ४ ₹ पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता

रशीद खान याला नागरिकत्व देण्यासाठी सुषमा स्वराज यांना भारतीयांनी विचारले, त्यांनी दिले उत्तर…!

भाबड प्रेम: मधुरा आणि चंद्रविलास याचं

LEAVE A REPLY

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.